Yogesh Kadam on Sanjay Raut : संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी सामनामधून काँग्रेसचे (Congress) विचार मांडायला सुरुवात केली आहे. त्यामुळं आता सामनामधील (Saamana) अग्रलेखाला किंमत नाही. वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) बिलावरुन सामना मधील आलेल्या अग्रलेखावर मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी टीका केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात उत्तम समन्वय
वक्फ बोर्डाच्या बिलाला नेमका विरोध का केला? हे संजय राऊत यांनी सांगावं. संजय राऊत यांनी तांत्रिक मुद्दे मांडले नाहीत असेही योगेश कदम म्हणाले. वक्फ बोर्डाच्या बिलावर संजय राऊत यांनी भावनिक मुद्दे मांडले आहेत. तांत्रिक मुद्दे मांडण्यात संजय राऊत यांना अपयश आल्याचे योगेश कदम म्हणाले. वक्फ बोर्डाची जमीन ही गरीब मुस्लिम समाजाच्या लोकांसाठी असताना त्या जमिनीचा वापर खरच गरीब लोकांसाठी झालाय का? असा सवाल योगेश कदम यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सुसूत्रता नसल्याचा खोटा प्रयत्न चुकीच्या बातम्या पसरवून केला जातोय. सगळे प्रोजेक्ट व्यवस्थित सुरु असल्याचे योगेश कदम म्हणाले. या दोघांमध्ये उत्तम समन्वय असल्याचे योगेश कदम म्हणाले.
लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या डोक्यात हवा गेली
आम्हाला बर्फाच्या लादीवर झोपवून फटके देणाऱ्यांवर बर्फाच्या लादीवर झोपण्याची वेळ आल्याची टीका योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंवर केली. लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या डोक्यात हवा गेली होती. जनतेने त्यांना जागा दाखवल्याचे योगेश कदम म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: