Yavatmal Water Crisis : राज्यभरातउन्हाचापारादिवसागणिकवाढतानादिसतआहे. परिणामीअनेकगावांमध्ये पाण्याचीसमस्या (Water Crisis) अधिक बिकटहोतआहे. अशातचयाचपाणीटंचाईचंभाषणवास्तवदाखवणारी बातमी आहेयवतमाळच्या अजंती पारधी बेड्यावरची. या बेड्या लगत नजर टाकल्यास दोन पाण्याच्या टाक्या 100 मीटरवर दिसूनयेतात. बेड्यावरील 56 कुटूंबाच्या घरासमोर नळही दिसतो. मात्र 15 दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वनवनभटकावंलागतंय. अशाचपाण्याच्याशोधात गेलेल्या 6 वर्षीय चिमुकलीची दुदैवी मृत्यू झाला आहे. हामृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र उष्मघाताचे कारणपुढेकरण्यातआलंअसलंतरीडॉक्टरांनीहिशक्यताफेटाळलीआहे. त्यामुळेयामृत्यूचंगूढकायमआहे.
मिळालेल्यामाहितीनुसार, या गावात पाण्यासाठी भीषण परिस्थिती असल्याने चिमुकलीला पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट करत जावे लागले. तिचा मृत्यू उष्माघाताचा बळी ठरलाय? की पाणी टंचाईचा? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Yavatmal Water Crisis : डोक्यावर कळशी घेऊन पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट
नेर तालुक्यातील अजंती पारधी बेडा 350 लोकसंख्या असलेले फासेपारधी समाजाचे गाव आहे. या गावातील प्रत्येक घरासमोर नळचे कनेक्शन आहे. मात्र या नळाला पाणी येत नाही. गावकऱ्यांना पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागते. याच गावातील अनवी अनाडी भोसले ही चिमुकली दुपारच्या सुमारास आपल्या घरून डोक्यावर कळशी घेऊन पाण्यासाठी गेली होती. मात्र ती परत आलीच नाही. बऱ्याचवेळानंतरतिचा रस्त्यावर चक्कर येऊन मृत्यू झाल्याचेकळूनआलंआहे.
Yavatmal Ner News : नळ पाण्याच्या टाकीपासून काही अंतरावर, नळाचे कनेक्शन शोभेच्या वस्तू?
अनवी हिला कुठलाही आजार नव्हता, शिवाय तिला मळमळ उलटी झाली नाही. त्यामुळे तिचा नेमका मृत्यू कसा झाला? याचा शोध आरोग्य यंत्रणा घेत आहे. अनवी हिचे शवविच्छेदन न झाल्याने तिचा मृत्यू कसा? याचा शोध कसा लावावा असा प्रश्न सुद्धा आरोग्य यंत्रणेपुढे आहे. गावातील हे दिलेले नळ पाण्याच्या टाकीपासून अगदी काही अंतरावर आहे. मात्र या नळातून हवे शिवाय काही येत नाही. शोभेच्या वस्तू हे नळाचे कनेक्शन झाले आहे. पाणी पुरवठा या नळातून होतो. त्यामुळे रोजच्या जगण्याचा प्रश्न असलेल्या या पारधी समाजाल पाण्यासाठी सुद्धा दरदर भटकंती करावी लागत आहे. एका चिमुकलीच्या मृत्यूनंतर तालुक्यातील प्रशासन खळबळून जागे झाले खरे. मात्र, आधीच पाणी पुरवठा सुरळीत झाला असता तर एका चिमुकलीचा जीव वाचला असता. चिमुकलीचा जीव गेल्यानंतर आता वराती मागून घोडे, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
