यवतमाळ : मुलाचं लग्न, पहिलं लग्न ,शेवटचं लग्न या नावाखाली गावभर पत्रिका वाटून त्या प्रतिष्ठेच्या नावाखाली लग्न कार्यात लोकांची गर्दी उसळत आहे अशाच पद्धतीने लग्न करणाऱ्या लग्न कार्यात पोलिसांनी पोहचून वर आणि वधूच्या नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला आहे. येथे मर्यादेपेक्षा अधिक मंडळी लग्न कार्यात जमली होती.  यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील महाळुंगी येथे विनापरवानगी आणि कोरोना नियमांना धाब्यावर बसवून सुरु असलेल्या लग्न समारंभावर आर्णी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 
 
महाळुंगी येथील कैलास राठोड यांच्या मुलीचा लग्न तालुक्यातील बोरगाव येथील शिवलाल चव्हाण यांच्या मुलासोबत वधूच्या राहत्या घरी महाळुंगी येथे कोरोना नियमांना धाब्यावर बसवून विवाह सोहळा सुरू होता. वराचे वडिल शिवलाल चव्हाण, वधूचे वडिल  भिकुसिंग राठोड  महाळुंगी यांच्यावर आणि मुलाचा मामा यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली. आहे. 


आर्णी पोलिसांनी आठवडाभरात शीरपूर येथील एक, उमरी इजारा येथील दोन तर पाभळ येथील एका लग्न समारंभावर कारवाई करत वर आणि वधूच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे.