Yavatmal Rain News :राज्यासहविदर्भातदेखीलपावसाचाजोरबघायलामिळतोआहे. गेल्याकाहीदिवसापासूनयवतमाळजिल्ह्यातसुरुअसलेल्यापावसानेएकचदाणादाणउडवलीआहे. अशातचआता यवतमाळच्या (Yavatmal Rain News) बाभूळगाव तालुक्यातील शेतीच्या विदारक परिस्थितीचेचित्रसमोरआलेआहे. बाभूळगाव तालुक्यात कोसळल्या 211 मिलिमीटर पावसामुळे बेंबळा प्रकल्पात जलसाठा वाढला आहे. तरएकाच वेळी धरणाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटर उघडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या (Yavatmal Farmar) डोळ्यादेखत सुपीक माती आणि उभं पिके (Rain News) पुरामुळे वाहून गेली. जमीनही खरडून गेल्याने आता मातीच नाहीतर शेती करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांन समोर उभा राहिला आहे. केवळ याच हंगामात नव्हे, तर रब्बी हंगामासाठी मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभंठाकलं आहे. यावेळी धरणांतून चुकीच्या पद्धतीने पाण्याचा विसर्ग केल्याचा आरोप सुद्धा या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.(Yavatmal Rain News)
 
Yavatmal Rain: पूर्वसूचनादेता एकाचवेळी बेंबळा प्रकल्पाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरने उघडले; शेतकऱ्यांचासंताप

यवतमाळ जिल्ह्याच्या बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा, पालोती, टाकलागव मांगूळ, पाणास विरखेड, वाटखेड (बु), वाटखेड (खु) गोंधळी, कीन्ही, मुबारपूर, राऊत सावंगी, हस्तपूर, गवंडी, खर्डा, येरणगाव, किन्ही, मांगसावंगी असा गावातील अंदाजे 4 हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. यात शेतकऱ्याच्या शेतातील कापूस, सोयाबीन, तूर पीक डोळ्यात समोर उध्वस्त झाले असून शेती साहित्यही वाहून गेलंय. यात जमीन सुद्धा खरडून गेल्याने या भागाचे तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Continues below advertisement

Yavatmal Rain News : दोन दिवसाच्या पावसाने 24 हजार शेतकऱ्यांना फटका; 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित

यवतमाळ जिल्ह्यात 29 आणि 30 जुलैला पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले. 16 तालुक्यातील 447 गावातील 24 हजार शेतकऱ्यांच्या 26 हजार 88 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला असून नुकसानीचा आकडा हा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सुरवातीला पावसाने खंड दिला. मात्र 29 आणि 30 जुलैला संततधार पाऊस पडल्याने नदी-नाल्या काठावरील पावसामुळे पूर येऊन आणि शेतात पाणी साचल्याने कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग तसेच इतर खरीप पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी नाल्यांना पूर आल्याने शेतीमध्ये गाळ साचला असून काही भागात पिके पूर्णपणे पाण्याखाली वाहून गेली. महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.

Continues below advertisement

कापूस -14 हजार 923 हेक्टर नुकसान

सोयाबीन- 8 हजार 15 हेक्टर नुकसान

तूर- 2 हजार 790 हेक्टर नुकसान

बाधित शेतकरी- 24 हजार

एकूण नुकसान- 26 हजार 88 हेक्टर

बाधित गावे- 447

Gadchiroli : रानटी हत्तींमुळे उभ्या पिकाची नासाडी; आधी अतिवृष्टी, पुरामुळे त्रस्त शेतकऱ्यांवर आता रानटी हत्तींचे दुहेरी संकट
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात पूरानंतर आता आणखी एक संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. भगवानपूर परिसरात रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालत अनेकांच्या शेतातील धान पिकाची नासधूस केली आहे. रात्री हत्तींच्या कळपाने शेतात घुसून उभे धान पीक अक्षरशः तुडवले. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असून, हत्तींच्या वाढत्या वावरामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, माजी आमदार कृष्णा गजबे यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी केली. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच रानटी हत्तींच्या कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
इतर महत्वाच्या बातम्या