Yavatmal Accident : यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाचा अपघातझाल्याची घटना घडली आहे. संजय देशमुख यांच्या वाहनाला अपघात हा साखरा गावाजवळ झाला. टिप्परने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. एका कार्यक्रमातून परत येताना दिग्रस रोडवरील साखरा गावाजवळ टिप्परने त्यांच्या वाहनाला दिली जोरदार धडक दिली.
सुदैवाने खासदार संजय देशमुख हे सुखरूप असून त्यांना किरकोळ दुखापत
या अपघातात खासदारांच्या वाहनाचे झाले नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने खासदार संजय देशमुख हे सुखरूप असून त्यांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर त्यांनी दिग्रस येथील मात्रे हॉस्पिटलमध्ये पूर्व तपासणी केली आहे. डॉक्टरांनी किरकोळ दुखापत असल्याचे सांगितल्याची माहिती मिळाली आहे. संजय देशमुख यांच्या वाहनाला अपघात हा साखरा गावाजवळ झाला. टिप्परने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.
भिवंडीतील अंजूर फाटा परिसरात भीषण अपघात, अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
भिवंडीतील अंजूर फाटा परिसरात हायवा डंपरने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. भार्गव पाटील (वय 24 रा. खारबाव) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. तसेच अपघातानंतर नारपोली पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदना करिता शहरातील शासकीय स्व.इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
वाहन चालकाच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
नेहमीप्रमाणे भार्गव कामावरून आपल्या घरी जात असताना रस्त्यावर अचानक भरधाव डंपरने धडक दिल्याने दुचाकीसह भार्गव थेट डंपरच्या खाली पडल्याने टायर खाली येऊन चिरडला गेला. ज्यामुळं त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे धक्कादाय घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी घटनेची माहिती नारकोली पोलिसांना दिली मात्र पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर वाहन चालकाच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या: