जागतिक त्वचा आरोग्य दिन | त्वचारोगतज्ज्ञ ऑनलाईन तपासणी करुन जनतेशी लाईव्ह संवाद साधणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात त्वचाविकार आणि केसांची काळजी कशी घ्यावी यावर मार्गदर्शन करणार आहे.

मुंबई : IADVL भारतीय त्वचारोगतज्ञ संघटना ही भारतातील दहा हजाराहून अधिक त्वचा डॉक्टरांची शिखर संघटना आहे. 6 एप्रिल हा जागतिक त्वचा आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त या संघटनेच्या, माध्यम कक्षाचे अध्यक्ष डॉ नितीन ढेपे यांनी संवाद साधला. जागतिक त्वचा आरोग्य दिवशी भारतातील सर्व त्वचारोगतज्ञ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर रुग्ण आणि जनतेशी लाईव्ह संवाद साधणार आहेत.
या वेळी ते लॉकडाऊनच्या काळात त्वचाविकार आणि केसांची काळजी कशी घ्यावी यावर मार्गदर्शन करणार आहे. अलीकडे सॅनिटायझरच्या अतिरिक्त वापरामुळे व साबणामुळे हाताला ऍलर्जी होण्याच्या केसेस वाढल्या आहेत. हात धुतल्यावर मॉइश्चयझर लावणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.
Dr. Nitin Dhepe | कोरोनापासून बचावासाठी शरिराची त्वचा कोरडी पडू देऊ नका : डॉ. नितीन ढेपे
कोरोना साथीच्या काळात तातडीचे नसलेल्या त्वचा तपासणी व उपचारासाठी ऑनलाईन तपासणी सर्व त्वचारोगतज्ंज्ञानी सुरू केली आहे. नव्वद ते पंच्यान्नव टक्के वेळा त्वचाविकार 'पाहिल्याने' निदान होऊ शकते. त्यासाठी प्रत्यक्ष क्लिनिक ला जाण्याची आवश्यकता नसते. ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. घरी थांबूनच त्वचारोगावरील उपचार चालू ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
डॉ. नितीन ढेपे म्हणाले, कोरोना हा लाससर त्वचेतून शरिरात प्रवेश करतो. म्हणजे डोळ्याच्या आतील त्वचा, नाकाच्या मधील त्वचा, तोंडातील त्वचा येथे जर कोरोनाचा विषाणू पोहचला तर तो आपल्या रक्तात पोहचतो आणि रक्तातून आपल्या फुप्फुसात पोहचतो. त्यामुळे हात स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. आपली त्वचा एकसंघ असल्याने कोरोनाचा विषाणू आत प्रवेश करू शकत नाही. त्वचेला जेव्हा छिद्र पडतात तेव्हा हा जंतू त्वचेतून शरिरात पोहचतो. छिद्र पडणे म्हणजे जेव्हा आपली त्वचा खूप कोरडी पडते .नाकातील त्वचा आणि डोळ्यातील त्वचा यावर कणखर आवरण नसल्याने हे जंतू सहज रक्तात मिसळतात. त्यामुळे त्वचा सलग असणे गरजेचे आहे. त्यामध्ये कुठेही भेगा असता कामा नये. साबणामुळे त्वचा कोरडी पडते. आपल्या शरिरावरील तेलकट थरामुळे धूळ, केमिकल, विषारी घटक या सर्वांचा प्रतिकार करतात. औषधी मलम लावून विषाणू मरणार नाही. त्यामुळे हात धुतल्यानंतर मॉइश्चयझर लावणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
