एक्स्प्लोर

World Mental Health Day: पाच वर्षात मानसिक आजारात 14 टक्क्यांनी वाढ! अहमदनगर जिल्ह्यातील भयान वास्तव 

World Mental Health Day: लहान मुले तसेच 15 ते 24 वयोगटात मानसिक आजाराचे प्रमाण वाढले आहे. या वयोगटात वाढलेला मानसिक आजार हा चिंतेचा विषय आहे.

World Mental Health Day: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत मानसिक आजाराच्या रुग्णांच्या संख्येत 14 टक्क्यांनी वाढ झाली. कोरोना काळानंतर हे प्रमाण अधिक वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. वाढलेला मोबाईल वापर आणि हरवलेला संवाद हे यामागचे प्रमुख कारण असल्याचेही मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य कक्षात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ही संख्या महिन्याला जवळपास दीड हजार एवढी आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात मानसिक आजाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या संख्येत 14 टक्क्यांनी वाढ झाल्याचे जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ञ डॉ.तेजस्विनी मिस्किन यांनी सांगितलं आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वाढलेला मोबाईलचा वापर आणि कुटुंबातील हरवलेला संवाद हे असल्याचेही त्यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे लहान मुले तसेच 15 ते 24 वयोगटात मानसिक आजाराचे प्रमाण वाढले आहे. या वयोगटात वाढलेला मानसिक आजार हा चिंतेचा विषय आहे.

अहमदनगर जिल्हा तसा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागात जर एवढे प्रमाण वाढत असेल तर शहरी भागात नक्कीच हे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात पाच वर्षांपूर्वी महिन्याला केवळ 200 ते 600 रुग्ण समुपदेशन आणि इतर उपचारासाठी येत होते. हीच संख्या सध्या 1200 ते 1500 पर्यंत गेली आहे.

ही आहेत मानसिक आजाराची प्रमुख लक्षणे

चिडचिडेपणा, सतत विचारांत मग्न राहणे, एकटे राहणे, उदास वाटणे, कामात लक्ष न लागणे, कामांमध्ये वारंवार चुका होणे, अति स्वच्छता, भीती वाटणे, भास होणे, भ्रम होणे, सतत नकारात्मक विचार करणे, एकटे बडबडणे, विनाकारण भांडणे, संशयीवृत्ती, अती बोलणे, एकलकोंडेपणा, आत्महत्येचा विचार येणे ही प्रमुख लक्षणे मानसिक आजाराची आहेत. 

मानसिक आजाराची लक्षणे आपल्यात जाणवली तर डॉक्टरांकडून समुपदेशन घेतल्यास वेळेत आपण या आजारापासून सुटका करून घेऊ शकतो. पूर्वीच्या काळात  कुटुंबात संवाद होता. मात्र सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात संवाद हरवला आहे.

 'गाव तेथे मानसोपचार' उपक्रम

मानसिक रुग्ण वाढत असल्याने जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम या विभागाने 'गाव तेथे मानसोपचार' हा उपक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यातील 800 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय. मात्र, खेडे गावात अशा पद्धतीने उपक्रम हाती घेण्याची वेळ आल्याने खरंतर ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे त्यामुळे मोबाईलचा अतिवापर थांबवणे आणि कौटुंबिक संवाद वाढवणे गरजेचे आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Mental Health : ‘आईमुळे मी नैराश्यातून बाहेर पडू शकले!’, दीपिका पदुकोणने पुन्हा एकदा डिप्रेशनवर केलं भाष्य

World Mental Health Day 2022 : मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा 'जागतिक मानसिक आरोग्य दिन'; वाचा

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget