Ajit Pawar : ग्लोबल वॉर्मिंगमुळे सर्व चक्र बदलत चालले आहे. आपले हवामान खाते ज्यावेळी पावसाचा अंदाज व्यक्त करते, तेव्हा पाऊस पडतच नाही. हवामानाचा अचूक अंदाज देणारी यंत्रणा विकसित करण्याचे काम सुरु असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. टप्प्या टप्प्यनं पाऊस पडतो, म्हणून उसाचे उत्पादन वाढले आहे. शेतकऱ्यांमुळे महाराष्ट्रच्या जीडीपी (GDP)वाढला असल्याचे अजित पवार म्हणाले.


सध्या महाराष्ट्रात वेगळ्या समस्या आहेत. काही लोक विनाकारण तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने घेऊन जात आहेत. भोंगे वाजवा, कशाला भोंगे वाजवा. याने तुमचे प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला. उत्तर प्रदेशचे उदाहरण देतात, मात्र तिथे सर्वाचे काढले ना? काही लोक धर्मात द्वेष निर्माण करत असल्याचे अजित पवार म्हणाले. तुम्ही योग्य नेत्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे, असेही पवार म्हणाले.


कृषी पुरस्कार पारितोषिकांची किंमत 5 पट करणार


कृषी पुरस्कार पारितोषिकांची किंमत 5 पट करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. सध्या 3 वर्षाच्या पुरस्कारासाठी 51 लाख रुपये लागले, त्यात वाढ करणार असल्याचे पवार म्हणाले. पुरस्कार देताना कोणी मजुराकडून काम करुन घेतली आणि कोणी स्वतः शेती करतो हे लगेच कळाले असेही पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांमध्ये कँन्सरचे प्रमाण वाढत आहे. अन्नधान्य, फळे ही रसायनमुक्त झाली पाहिजे. उत्पादन वाढवण्यासाठी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले. कोळसा टंचाईमुळे भारनियमनासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलर प्रकल्प उभारण्यावर भर देर असल्याचे अजित पवार म्हणाले. 250 कोटी खर्च करुन पुण्यात कृषी भवन उभारणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
 
कृषी, क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा आज नाशिकमध्ये सन्मान झाला. नाशिकमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीनं शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कारांनी  सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,  कृषीमंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.