मुंबई : दहा महापालिका निवडणुकांच्या मतदानात महिला मतदारांनी पुरुषांवर आघाडी मिळवली आहे. 28.33 टक्के महिला मतदारांनी मतदान केल्याची आकडेवारी आहे, तर 28.19 टक्के पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक आयोगाच्या अंतिम आकडेवारीनुसार दहा महापालिकांमध्ये मिळून 25 लाख 70 हजार 410 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 90 लाख 71 हजार 691 महिला मतदारांची नोंद आहे. त्यामुळे मतदान करणाऱ्या महिलांची आकडेवारी 28.33 टक्के इतकी होते.

दुसरीकडे, 29 लाख 50 हजार 38 पुरुषांनी मतदान केलं. एकूण 1 कोटी 4 लाख 64 हजार 763 पुरुष मतदारांची नोंद असल्याने ही टक्केवारी 28.19 टक्के होते. टक्केवारीत महिला अग्रेसर असल्या तरी मतदारांचे आकडे मात्र पुरुषांच्या तुलनेत कमीच आहेत.

रत्नागिरी या एकमेव जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी 5 लाख 62 हजार 400 महिलांनी तर 5 लाख 9 हजार 409 पुरुषांनी मतदान केलं.

ग्रामीण भागात मात्र ही टक्केवारी उलट पाहायला मिळाली. 70.8 टक्के पुरुष मतदारांनी, तर 68.15 टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.