Winter Session Nagpur : पुढच्या महिन्यात 8 डिसेंबरपासून नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन काही दिवस पुढे ढकलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक कामे असताना अधिवेशनासाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवू शकते, त्यामुळे अधिवेशन 8 ते 10 दिवस पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. आज नागपुरात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान यासंदर्भातले संकेत दिले आहेत. 

Continues below advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची चिन्हे 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची चिन्हे आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणूकीचे मतदान होईल. त्यामुळे सरकारी यंत्रणा सातत्याने कामात असेल. त्यामुळे हिवाळी अधिवेशन त्यानंतरच घेणे योग्य ठरेल अशी चर्चा शासकीय पातळीवर सुरू असली तर् कुठलाही निर्णय झालेला नाही.

डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणूकीचे मतदान होण्याची शक्यता

दरम्यान, ठेकेदारांच्या काम बंद आंदोलनामुळे अगोदरच हिवाळी अधिवेशनावर संकटाचे ढग दाटले आहेत. मंत्र्यांच्या अनेक बंगल्यांचे काम प्रलंबित आहे. 150 कोटींची बिले थकीत असल्याने ठेकेदारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे नागपूरऐवजी मुंबईत अधिवेशनाची चर्चा सुरू झाली होती. मात्र नागपूर करारानुसार विधीमंडळाचे एक सत्र नागपुरमध्ये घेणे बंधनकारक आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची चिन्हे आहेत. डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणूकीचे मतदान होईल. त्यात सरकारी यंत्रणादेखील कामात असेल. त्यामुळे त्यानंतरच हिवाळी अधिवेशन घेणे शक्य गोणार आहे. याबाबत विचार सुरू आहे, मात्र कुठलाही निर्णय वगैरे झालेला नाही. अखेरचा निर्णय सर्वसंमतीनेच होईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. उपराजधानीसह राज्यात अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असून रस्ते वेडेवाकडे खोदून ठेवले जातात. याला प्रामुख्याने जेसीबी चालक जबाबदार असतात. निर्देशांचे पालन न करता ते मनमानी पद्धतीने रस्ते खोदून ठेवतात. त्याचा फटका जनतेला बसतो. त्यामुळे अशा जेसीबीचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले आहेत. सोबतच खोदकाम करणाऱ्या नागपुरातील सर्व संबंधित एजेन्सीजची एक संयुक्त बैठक येत्या आठवड्यात घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, विशेष अधिवेशन बोलवा; मुसळधार पावसानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मागणी