नागपूर : एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते येत्या काळातील महापालिका निवडणूका आज महाविकास आघाडीत एकत्र असणारे पक्ष एकत्र लढणार अशा आशयाची वक्तव्य करत असताना काँग्रेस मात्र त्यांची हिट विकेट करण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. मुंबई अध्यक्ष झाल्यावर भाई जगताप ह्यांनी 'एकला चलो रे' ची री ओढली आणि आज नागपुरात हेच म्हणजे स्वबळावर लढण्याचे संकेत प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरतांकडून मिळाले आहे.


आज नागपुरात काँग्रेसच्या राजभवन घेराव आंदोलनासाठी थोरात आणि भाई जगताप दोघे ही नागपुरात आले. त्यावेळी मुंबईसाठी भाईंची असणारी भूमिका ही राज्यात ही अवलंबणार का हा सवाल थोरतांना केला असताना प्रत्येक पक्षाला वाढण्याचा प्रयत्न करायचा असतो असे सूचक विधान त्यांनी केले


महापालिका निवडणूक म्हटली की, शहरी चेहरा असणारी निवडणूक. त्यामुळे राष्ट्रवादीला ती मुंबईत सेनेबरोबर आणि राज्यात काँग्रेस बरोबर लढली तर जास्त फायदा आहे. शिवसेना ही उपराजधानी सारख्या शहरात एक किंवा दोन नगरसेवकांवर सीमित असते. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी सेनेचा ही एकत्र लढून फायदा होऊ शकतो. मात्र सध्या नव्या दमाने काँग्रेस मैदानात उतरू पाहत आहे. विधान परिषद निवडणुकीतील फायदा बघता आणि विदर्भात गेल्या निवडणुकीत नागपूर, चंद्रपूर, अकोला येथे झालेला फायदा बघता, येत्या काळात फायदा होईल असे वाटणारी काँग्रेस दुसऱ्या कोणाला वाटा द्यायला तयार नसल्यास यामध्ये फार काही आश्चर्य नाही.


संबंधित बातम्या :



'आम्ही केंद्राचे काळे कायदे मोडून काढू', कृषि कायद्यांविरोधात काँग्रेसचा नागपुरात राजभवनाला घेराव


Congress Protest | नागपुरातल्या राजभवनावर काँग्रेसचा मोर्चा; बाळासाहेब थोरात यांचं भाषण