Kolhapur News : अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसैनिकांनी आज कोल्हापूर सांगली महामार्गावर आंदोलन केले. यावेळी कृषीमंत्री कोल्हापुरात आल्यानंतर कोल्हापुरी पायताणचा प्रसाद देऊ, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिला.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतले. परतीच्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. शिवसेनेकडून हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, राज्य सरकारने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना अजून भरपाई मिळालेली नाही. पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा आंदोलन करणार आहोत, जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही दडपशाही असल्याचा आरोप त्यांनी केला.
संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर केला नाही, तर 15 दिवसांनी पुन्हा आंदोलन करणार आहोत, त्यावेळी जबाबदारी सरकारची राहील असा इशारा दिला.
इतर महत्वाच्या बातम्या