पुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षीय मुलीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. आयाज शेख असं या मारेकऱ्याचं नाव असून पत्नी तब्बसूम शेख आणि मुलगी अलिना शेख अशी मृतांची नावं आहेत. आरोपी आयाज शेख खाद्यपदार्थ डिलिव्हरी बॉयचे काम करतो.
आयाज शेख आणि तब्बसूम शेख यांचं काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं. त्यांना अलिना नावाची अडीच वर्षाची मुलगी होती. नवरा बायकोमध्ये मागील काही दिवसांपासून सारखे भांडण होत असे. आयाज पत्नीवर सारखा संशय घेत होता. यामुळे त्याला वैतागून तब्बसूम स्वतंत्र राहत होती. या दोघांची घटस्फोटाची केसही सुरु होती.
आयाजने सोमवारी रात्री उशिरा पत्नी राहत असलेल्या घरात खिडकीतून प्रवेश केला. कोणीच नाही याची खात्री करुन त्याने पत्नी आणि मुलीवर चाकूने वार करुन त्यांची हत्या केली. नंतर त्याने भिंतीवर रक्ताने 'मैं किसको नही छोडूंगा, निकल जाओ ये घर छोडके', असा मेसेज लिहिला.
या घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी रक्ताने माखलेला चाकू सापडला आहे. आरोपीला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरु आहे
घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षीय मुलीची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jan 2019 09:24 AM (IST)
आयाज शेख आणि तबस्सूम शेख यांचं काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं. त्यांना अडीच वर्षाची मुलगी होती. दोघा नवरा बायकोत मागील काही दिवसांपासून सारखे भांडण होत असे. आरोपी पत्नीवर सारखा संशय घेत होता. यामुळे त्याला वैतागून मयत पत्नी स्वतंत्र राहत होती
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -