Suresh Dhas on Pankaja Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर आज (28 डिसेंबर) सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले. संतोष देशमुख प्रकरणात सुरुवातीपासून आक्रमकपणे बाजू मांडत असलेल्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आज मोर्चाला संबोधित करताना मुंडे बंधू भगिनींवर घणाघाती प्रहार केला. सुरेश धनंजय मुंडे यांच्या कारभारावर ताशेरे ओढत बोगस मतांनी निवडून आल्याचा गंभीर आरोप केला. 330 पैकी 230 बूथ ताब्यात असल्यावर काय होणार? असा सवाल सुरेश धस यांनी केला. सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर हल्लाबोल केला. 


पंकूताई संतोषच्या घरी का गेला नाही? 


सुरेश धस म्हणाले की, माझा सवाल पंकू ताईंना आहे. छत्रपती संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टला उतरला होता. 12 डिसेंबरला गोपीनाथरावांची जयंती आहे, मान्य पण तुम्ही वाट वाकडी करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? असा सवाल सुरेश धस यांनी केला. ते पुढे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी अवैद्य धंदे बंद केले, पण पंकजा ताई तुम्हाला चांगले लोकं चालत नाहीत.  



तुम्हाला जी हुजिरी करणारे लोकं हवेत 


सुरेश धस यांनी सांगितले की पंकूताई तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवे आहेत. पंकू ताई तुम्ही चुकला आहात, तुम्हाला द्यायचं असेल तर उत्तर द्या, अन्यथा नाही दिलं तरी चालेल. त्यांनी पुढे सांगितले की, मंत्रीपद भाड्याने दिलं आहे, असं पंकू ताई म्हणत होत्या, पण मी म्हणतो केवळ पालकमंत्री पद नाही तर कृषीमंत्रीपदही भाड्याने दिलं होतं. धस यांनी पैसे गेले तरच फाईल मंजूर होतं होती. ही आमच्या जिल्ह्याची करूण कहाणी, करून कहाणी म्हणतो करुणा नाही, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. धस यांनी सांगितले की, पहिली बायको आहे ती करुणा, पण त्या मायमाऊलीची अवस्था बघा, असे त्यांनी सांगितले. 1400 हेक्टर एकर जमीन यांनी ढापल्याचा आरोपही धस यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या