एक्स्प्लोर

Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?

Rajendra Jain: राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील एक ज्येष्ठ आणि वजनदार राजकारणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील एक प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

Rajendra Jain: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा असतानाच भाजपच्या नवनीत राणा यांच्याही नावाची चर्चा रंगल्याने भूवया उंचावल्या होत्या. मात्र, अखेर पक्षाकडून राजेंद्र जैन यांच्या पारड्यात वजन टाकण्यात आले. राजेंद्र जैन प्रफुल पटेल यांचे विश्वासू शिलेदार ते एकेकाळी त्यांचे स्वीय सहाय्यक राहिले आहेत. 

कोण आहेत राजेंद्र जैन?

राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील एक ज्येष्ठ आणि वजनदार राजकारणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील एक प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि एकेकाळचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करत असतानाच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सक्रिय वावर आणि प्रभाव वाढत गेला.

विधान परिषदेवर आमदार

विधान परिषद सदस्य (माजी आमदार): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या पक्षकार्याची दखल घेत त्यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर पाठवले होते. 2016 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परिणय फुके यांच्याकडून पराभव झाला होता.

पक्षीय व संघटनात्मक जबाबदाऱ्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्व विदर्भातील संघटनात्मक बांधणीत राजेंद्र जैन यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पक्षाने त्यांच्यावर वेगवेगळ्या काळात गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांची महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपवली होती. 

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान

राजकीय क्षेत्रासोबतच राजेंद्र जैन यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान राहिले आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या आणि विदर्भातील एक नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'गोंदिया एज्युकेशन सोसायटी'चे सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे काम पाहिले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget