1. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडची अवस्था बिकट, पावसाने खेळ थांबला तोपर्यंत न्यूझीलंडच्या  46.1 षटकात 5 बाद 211 धावा
https://bit.ly/2XCaQTu


2. पद्मसिंह पाटलांनी माझी सुपारी दिली होती, पण ते शरद पवारांचे नातेवाईक असल्याने कुणी दखल घेतली नाही, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची सीबीआय कोर्टात साक्ष
https://bit.ly/2XT4zlK

3. खासगी नोकऱ्यांमध्ये भूमीपुत्रांना 70 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय मध्यप्रदेश सरकार घेणार, मुख्यमंत्री कमलनाथ यांची विधानसभेत माहिती, अशा प्रकारे आरक्षण देणारं मध्य प्रदेश पहिलं राज्य असणार
https://bit.ly/2Lc2VWA

4. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत उद्धव ठाकरेही पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करणार, तर लोकं सोनिया गांधींना भेटतात आम्ही विठ्ठलाला भेटू असं म्हणत संजय राऊत यांच्याकडून पंढरपूर दौऱ्यावर शिक्कामोर्तब
https://bit.ly/2G6Blpw

5. बेस्टच्या भाडेकपातीच्या पहिल्याच दिवशी भरभरुन प्रतिसाद, पहिल्या टप्प्याचं भाडं केवळ पाच रुपये केल्यानं मुंबईकरांना दिलासा
https://bit.ly/2xEOaCE

6. नऊ वर्षापूर्वी पुण्यातून बेपत्ता झालेला युवक बनला छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर, छत्तीसगड पोलिसांनी जाहीर केलेल्या नक्षलवाद्यांच्या यादीत नाव आल्यानं धक्कादायक माहिती समोर
https://bit.ly/2LcCakK

7. नवनीत कौर राणा, इम्तियाज जलील यांच्यासह महाराष्ट्रातील 48 पैकी 15 खासदारांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान, लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीची मागणी
https://bit.ly/30iSofw

8.नेटफ्लिक्सच्या 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा अखेर संपली, 15 ऑगस्टला दुसरा सीझन नेटफ्लिक्सवर उपलब्ध होणार
https://bit.ly/2XDcj7k

9. दारु प्यायलात तर गाडीचं इंजिनच सुरु होणार नाही असं अनोखं तंत्रज्ञान भारतात आणण्याचा नितीन गडकरींचा विचार, राज्यसभेत बोलताना माहिती
https://bit.ly/2XU56Ur

10. मराठमोळ्या दीपक कोनाळेसह दहा भारतीयांनी सर केला युरोप खंडातील सर्वात उंच माऊंट एलब्रुस पर्वत, निद्रिस्त ज्वालामुखी असलेला हा पर्वत सर केल्यानं सर्वांचं कौतुक
https://bit.ly/32gbeWl