1. सध्या देशातील अर्थव्यवस्थेसाठी गेल्या 70 वर्षातील सर्वात कठीण काळ, निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांचं अर्थव्यवस्थेबाबत मोठं वक्तव्य https://bit.ly/2zfaZ0r, तर माध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा राजीव कुमार यांचा दावा

  2.  

    दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांच्या पुतळ्यासोबत सावरकरांचा पुतळा बसवण्याला काँग्रेसप्रणित एनएसयूआयचा विरोध https://bit.ly/2TWhdMi

  3. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक अडचणीत, लंडनच्या क्वीन कौन्सिलचा आक्षेप, राज्य सरकारकडून बाजू मांडण्यासाठी समिती गठित

  4. सप्टेंबरमध्ये सिडकोची नवी मुंबईत 95 हजार घरांची लॉटरी, अल्प, अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांना फायदा https://bit.ly/2ZdIwrg

  5. राज ठाकरेंच्या चौकशीनंतर मनसेची ईडीला नोटीस, ईडीच्या कार्यालयाबाहेरील फलक मराठी भाषेत नसल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार https://bit.ly/2HmoAYl

  6.  

    कांद्याच्या दरात वाढ, सहा महिन्यांपूर्वी 800 ते 900 रुपये क्विंटल दराने विक्री होणाऱ्या कांद्याचा दर प्रति क्विंटल 2500 रुपये, दिवाळीपर्यंत दर चढेच राहणार https://bit.ly/30qQFW8

  7. थकित कर्ज न फेडल्याने तेल कंपन्यांनी सहा विमानतळांवर एअर इंडियाचा इंधन पुरवठा रोखला, विमानसेवेवर अद्याप कोणताही परिणाम नाही https://bit.ly/2L21wz5

  8. 10 लाख शेतकऱ्यांना पीकविम्याचे 960 कोटी रुपये शिवसेनेमुळे मिळाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दावा https://bit.ly/2PkFKwa

  9.  टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदावरुन संजय बांगर यांची उचलबांगडी, फलंदाजी प्रशिक्षकपदावर माजी कसोटीवीर विक्रम राठोड यांची नियुक्ती https://bit.ly/2PdtYU6

  10. महेंद्रसिंग धोनीचा राजकीय अवतार वायरल, राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण https://bit.ly/2KPY3Vp