Hyderabad Gazetteer: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्यासाठी, तसेच सातारा आणि औंध संस्थानच्या गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण केले होते. यानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्यासाठी मान्यता देत उपोषणावर तोडगा काढला होता. आता हैदराबाद गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी सापडणार आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता हैदराबाद गॅझेटची कार्यपद्धती कशी असणार? याबाबत माहिती देण्यात आली आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी पत्र प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीमध्ये समिती सदस्य म्हणून ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी तालुकास्तरीय समितीकडे अर्ज सादर करावा लागणार आहे.
ही प्रक्रिया कशी असेल हे जाणून घेऊया
- गाव पातळीवर समिती गठीत करण्यात येणार
- समिती सदस्य म्हणून ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्य कृषी अधिकारी
- कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी तालुकास्तरीय समितीकडे अर्ज सादर करावं लागणार
- अर्जदार हा मराठा समाजातील भुधारक, भूमीहिन, शेतमजुर किंवा बटईने शेती करत असलेल्या जमीनीची मालकी असल्याचा पुरावा सादर करेल
- पुराव नसल्यास त्यांनी 13 ऑक्टोबर, 1967 पूर्वी त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करेल
- अर्जदाराच्या गावातील, कुळातील नातेसंबधातिल व्यक्तींना कुणती जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व अर्जदार यांनी, त्यांचे नातेसबंधातील, कुळातील असुन कुणबो असल्याचे संबधीत नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र सादर करेल.
- अर्जदाराकडे अर्जाच्या पृष्ठत असणारे इतर पुरावे सादर करु शकतील.
- अर्ज तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त झाल्यानंतर तालुका स्तरीय समिती अर्जदार यांचे अर्जाची छाननी करील व गावपातळीवर गठीत समितीस चौकशीसाठी पाठवेल.
- गाव पातळीवर गठीत स्थानिक समिती अर्जदार यांची गावातील वयस्कर, जेष्ठ, पोलिस पाटील अशा नागरीकासमक्ष चौकशी करुन अहवाल तालुकास्तरीय समितीकडे सादर करील.
- तालुकास्तरीय समिती, गाव पातळीवर गठीत समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालाचे अवलोकन करेल
- तसेच अर्जावर शिफारस करील व त्यानुसार अर्जदाराच्या अर्जावर विहित कार्यपध्दतीने सक्षम प्राधिकारी यांच्या मार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात यईल.
दुसरीकडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांना सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात आलेली आहे.
समिती सदस्य
1. ग्राम महसूल अधिकारी2. ग्रामपंचायत अधिकारी3. सहाय्य कृषी अधिकारी
1. शासन निर्णय दिनांक 02/09/2025 अन्वये नागरीक कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी खालील कागदपत्रासह तहसिल कार्यालयातील शासन निर्णय दिनांक 25/01/2024 अन्वये गठीत केलेल्या तालुकास्तरीय समितीकडे अर्ज सादर करतील.
अ. अर्जदार हा मराठा समाजातील भुधारक, भूमीहिन, शेतमजुर किंवा बटईने शेती करत असलेल्या जमीनीची मालकी असल्याचा पुरावा सादर करेल.
आ. वरील अ प्रमाणे पुराव नसल्यास त्यांनी 13 ऑक्टोबर, 1967 पूर्वी त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करेल.
इ. अर्जदाराच्या गावातील/कुळातील नातेसंबधातिल व्यक्तींना कुणती जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व अर्जदार यांनी, त्यांचे नातेसबंधातील / कुळातील असुन कुणबी असल्याचे संबधीत नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र सादर करेल.
ई. अर्जदाराकडे अर्जाच्या पृष्ठत असणारे इतर पुरावे सादर करु शकतील.
2. असा अर्ज तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त झाल्यानंतर तालुका स्तरीय समिती अर्जदार यांचे अर्जाची छाननी करील व शासन निर्णय दिनांक 02/09/2025 अन्वये गावपातळीवर गठीत समितीस चौकशीसाठी पाठवेल.
3. गाव पातळीवर गठीत स्थानिक समिती अर्जदार यांची गावातील वयस्कर जेष्ठ, पोलिस पाटील अशा नागरीकासमक्ष चौकशी करुन अहवाल तालुकास्तरीय समितीकडे सादर करील.
4. तालुकास्तरीय समिती, गाव पातळीवर गठीत समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालाचे अवलोकन करुन सदर अर्जावर शिफारस करील व त्यानुसार अर्जदाराच्या अर्जावर विहित कार्यपध्दतीने सक्षम प्राधिकारी यांच्या मार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
इतर महत्वाच्या बातम्या