Weather Update News : राज्यात सध्या वातावरणात (Weather) सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे, तर कुठं पावसाची (Rain) हजेरी लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, या बदलत्या वातावरणामुळं राज्यातील शेतकरी (Farmers) मात्र, चिंतेत आहेत. या वातावरणातील बदलाचा शेती पिकांना (Agriculture Crop) फटका बसण्याची शक्यता आहे. आज परभणी (Parbhani) शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली.  या पावसामुळं रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जातेय.  


रब्बी पिकांचे नुकसान होण्याची भीती


हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज परभणी शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. जवळपास 15 मिनिटांपासून हा पाऊस सुरु आहे. गेल्या दोन दिवसापासून शहरासह जिल्हाभरात होतं ढगाळ वातावरण होत आहे.  आज 5 वाजण्याच्या सुमारास परभणी शहरासह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसतोय. या पावसामुळं वातावरणात गारवा वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.


तळ कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढील 3 दिवस पावसाची शक्यता


भारतीय हवामान केंद्राच्या प्रादेशिक केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, तळ कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढील ३ दिवस हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवार ३ डिसेंबरला तळकोकणातील सिंधूदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून बुधवारी सिंधूदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापुरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सोलापूर, सांगली, तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर नांदेड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आता वायव्येकडे सरकत असल्यानं महाराष्ट्रात सध्या असणारी कडाक्याची थंडी ओसरणार असून तापमानाचा टक्का वाढणार आहे. वातावरण दमट व ढगाळ राहणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  ‘फेंगल’ चक्रीवादळाने तमिळनाडूच्या किनारपट्टीला धडक दिल्यानंतर पुद्दुचेरी, कुड्डालोर आणि विल्लुपूरम् यांच्या शेजारी भागात अल्प दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. हे चक्रीवादळ हळूहळू पश्‍चिमेकडे सरकेल आणि नंतर त्याची तीव्रता न्यून होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. 


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद