Water Storage Of All Maharashtra Dam: 'एल निनो' (El Nino) प्रभावामुळे यावर्षी कमी पावसाचा (Maharashtra Rain Updates) अंदाज वर्तवण्यात आला होता. जून महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील बहुतांश धरणांनी तळ गाठल्यामुळं राज्यातील मोठ्या शहरांमध्ये पाणी कपात लागू करण्यात आली होती. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने जोर धरला आणि एका महिन्याच्या आत राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली आहेत. राज्यातील सर्व मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता (Water Storage Of All Maharashtra Dam) मिटली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख धरणांची आज काय परिस्थिती आहे आणि त्याचा काय परिणाम होणार आहे, जाणून घ्या...

Continues below advertisement
  • 117 टीएमसी क्षमता असलेलं महाराष्ट्रातील सर्वात उजनी धरण 100 टक्के भरलं असून त्यामुळं पुणे, सोलापूर आणि आहिल्यानगर या जिल्ह्यांची चिंता मिटणार आहे . सोलापूर जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झालेला असताना देखील पुणे जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं उजनी धरण भरलंय. 
  • राज्यातील दुसरं मोठं धरण असलेलं 106 टीएमसी क्षमतेचं कोयना धरण 75 टक्के भरलं आहे. त्यामुळं सातारा आणि सांगली जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे.
  • मराठवाड्यासाठी महत्वाचं असलेलं धरण 62 टक्के भरलंय. नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाचा परिणाम म्हणून 27 दिवसांमध्ये 25 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय. यामुळं छत्रपती संभाजी नगर आणि जालना या दोन जिल्ह्यांच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे. 
  • कोकण विभागातील 11 धरणांमध्ये 85.39 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 
  • पुणे विभागातील 35 धरणांमध्ये 82.87 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
  • नाशिक विभागातील 22 धरणांमध्ये मिळून 73.24 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
  • छत्रपती संभाजी नगर विभागातील 44 धारांमध्ये 45.66 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 
  • अमरावती विभागातील 10 धरणामध्ये मिळून 43.99 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 
  • नागपूर विभागातील 16 धारांमध्ये 53.92 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

राज्यातील एकूण धरणांमध्ये मिळून सध्यास्थितीला 69.43 इतका पाणीसाठा जमा- (Water Storage Of All Maharashtra Dam)

राज्यातील एकूण धरणांमध्ये मिळून सध्यास्थितीला 69.43 इतका पाणीसाठा जमा असून मागीलवर्षी हाच पाणीसाठा 76.14 इतका होता. मात्र एल-नीनोच्या प्रभावाची शक्यता वर्तवली जात असताना महाराष्ट्रात झालेल्या या पावसामुळे बऱ्याच मोठ्या भागाला दिलासा मिळाला आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

Continues below advertisement

ही बातमीही वाचा:

Jayakwadi Dam Water Storage: मराठवाड्याला मोठा दिलासा! अवघ्या 27 दिवसांत जायकवाडीत 25 टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा कुठवर?