Water Resources Department : महाराष्ट्रासाठी (Maharashtra) आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जलसंपदा विभागाने (Water Resources Department) तीन कंपन्यांसोबत एकूण 9 करार केले आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे उपस्थित होते. या करारानुसार राज्यात 8 हजार 905 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. 57  हजार 760 कोटी रुपयांची गुंतवणुकीचे (Investment) हे करार आहेत. तीन कंपन्यांसोबत केलेल्या करारातून 9 हजार 200 रोजगारांची निर्मिती होणार आहे. महाजेनको, एमआरईएल, आवादा या तीन कंपन्यासोबत करार झाले आहेत. 

Continues below advertisement

वीज निर्मीती करण्यावर भर

सरकार वीज निर्मीती (Electricity generation) करण्यावर भर देत आहे. यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. आज जलसंपदा विभागानं तीन कंपन्यांसोबत 9 महत्वाचे करार केले आहेत. यानुसार, राज्यात 8 हजार 905 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. तर 57  हजार 760 कोटी रुपयांची गुंतवणुक होमार आहे. तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार आहे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. हे बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी ही गुंतवणूक महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, अशी वीज निर्मिती केल्यामुळं याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचं देखील बोललं जात आहे. 

लवकरच शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज उपलब्ध करुन देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

शेतकऱ्यांना दिवसभर शेतीसाठी वीज देऊ अशी घोषणा सरकारने केली होती. 80 टक्के महाराष्टात आता लवकरच दिवसा 10 तास वीज उपलब्ध करून दिली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. विहीर पुनर्भरण ही योजना जर हातात घेतली तर त्याचा फायदा होईल, विहिरींची पातळी वाढेल, आपण जर असाच उपसा करीत राहिलो तर आपलाही प्रदेश रेगिस्थान झाल्याशिवाय राहणार नाही, असा संभाव्य धोकाही फडणवीसांनी बोलून दाखवले होते.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शिवराजसिंह चौहान यांनी प्रत्येकाला घर देण्यासाठी पाऊल उचलले आहे. घराकरिता 2 लाख रुपये मिळतील हा निर्णय आपण केला आहे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलर लागेल. त्यामुळे, नागरिकांना मोफत वीज मिळेल, असेही फडणवीसांनी म्हटले होते.  महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बिल कमी होणार आहे, मोठ्या प्रमाणात लोकांना दिलासा मिळणार आहे.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज, महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बील कमी होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा