Washim : वाशिमच्या रिसोड नगरपरिषदेच्या प्रारुप प्रभाग रचनेची गोपनीय माहिती बाहेर आली आहे. अधिकृत तारखेच्या आधीच माहिती बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे. प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची अधिकृत तारीख 18 ऑगस्ट असताना वाशिम जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेली वार्ड रचना अहवाल प्रत काही लोकांच्या हाती आल्याने खळबळ उडाली आहे. आधीच प्रारूप प्रभाग रचनेवरून रिसोड शहरात राजकीय वातावरण तापलेले आहे. अशातच आता या माहिती लिक प्रकरणामुळं संशयाची सुई संबंधित अधिकाऱ्यांकडे वळत आहे.

दस्तावेज लिक प्रकरणात सहभागी असणाऱ्यांवर कारवाई होणार

दरम्यान, या प्रकरणी रिसोड नगरपालिकाचे माजी नगरसेवक इरफान कुरेशी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन पुन्हा प्रभाग रचना करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे. तर वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवणेश्वरी एस यांनी प्रारुप प्रभाग रचनाची यादी प्रकाशी होण्यापूर्वी  लिक झाली या बद्दलची तक्रार प्राप्त झाली असून, याबाबत  चौकशी सुरू केली असल्याचे सांगितले आहे. मात्र, याबाबत मंत्रालयाकडे प्रारुप प्रभाग रचना यादी पाठवली असता लिक कशी आणि कुठून झाली? या बाबत माहिती नसल्याचं सांगितले. जे कुणी या दस्तावेज लिक प्रकरणात सहभागी असेल त्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बुवणेश्वरी एस यांनी दिली आहे. 

प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची अधिकृत तारीख 18 ऑगस्ट आहे. मात्र, वाशिम जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेली  वार्ड रचना अहवाल प्रत काही लोकांच्या हाती आल्याने खळबळ उडाली आहे. आधीच प्रारूप प्रभाग रचनेवरून रिसोड शहरात राजकीय वातावरण तापलेले असताना आता या माहिती लिक प्रकरणामुळं अधिकाऱ्यांवर संशय घेतला जात आहे. यामध्ये नेमकं कोण कोण सामील याची माहिती घेतली जात आहे. यानंतर कारवाई देखील करकण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बुवणेश्वरी एस  यांनी दिली आहे. या प्रकरणी रिसोड येथील इरफान कुरेशी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून, या प्रकरणाची चौकशी करून पुन्हा प्रभाग रचना करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.

राज्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्यासंबंधी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

Municipal Elections : राज्यातील महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच? प्रभाग रचना, आरक्षण अन् मतदार यादीसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाज