Washim News : वाशिम जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. बेपत्ता युवकाचा एका विहिरीत मृतदेहआढळल्यानं खळबळ उडाली आहे. दुर्गेश माहोरे असं या 32 वर्षीय युवकाचं नाव आहे. वाशिमच्या कारंजा शहरातील खाटीकपुरा परिसरातील हा रहवासी होता. शहरालगतच्या विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, या मृत्यूबाबत अद्याप अधिकची माहिती मिळाली नाही. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Continues below advertisement

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली

दुर्गेश माहोरे काल पासून बेपत्ता होता. कुटुंबियांने  शोधाशोध केली असता दुर्गेश आढळून न आल्याने आज शोध सुरू असताना आज  दुपारी शहराजवळ परिसरातील विहिरीत त्यांचा मृतदेह एका व्यक्तीला आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.

2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा इटियाडोह जलाशयात मृतदेह आढळला, धुळवडीच्या दिवसापासून तरुण होता बेपत्ता

 
वाशिम जिल्ह्यातनंतर गोंदिया जिल्ह्यात देखील धक्कादायक गटना घडली आहे. जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील एक युवक धुळवडीच्या दिवशी गावात मित्रांसोबत मौजमजा करून घरी पोहोचला नव्हता. त्यानंतर तब्बल दोन दिवसांनी त्या तरुणाचा मृतदेह तिबेट कॅम्प जवळील इटियाडोह जलाशयात आढळला आहे. या घटनेनं गोंदिया जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. आशिष मेश्राम (वय 23) रा. बोंडगावदेवी असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. आशिष हा मित्रासोबत धुळवडीच्या दिवशी मौजमजा करीत असताना गावातील अनेकांनी पाहिले होते. मात्र मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आशिष घरी परतला नाही. त्यामुळं त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. पण त्याचा पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी वडील जितेंद्र व मोठा भाऊ प्रशिक नातेवाईकाकडे शोध घेतला. पण दुसऱ्या दिवशी देखील त्याचा पत्ता लागला नाही. त्यानंतर आशिषच्या वडिलांनी गुरुवारी स्थानिक पोलिस स्टेशन येथे मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आशिषची शोधाशोध सुरु केली होती. तब्बल दोन दिवसांनतरइटियाडोह जलाशयात तिबेट कॅम्प जवळ आशिषचा मृतदेह आढळून आला आहे.
 
महत्वाच्या बातम्या:
Continues below advertisement