वाशिम : वाशिममधील मंगरुळपीर शहराजवळ चमेली तलावात बुडून चार लहानग्यांचा मृत्यू झाला. यातील दोघेजण सख्खे भाऊ आहेत. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
मंगरुळपीरच्या अशोकनगरमध्ये राहणारी 9 ते 15 वयोगटातील ही मुलं पोहण्यासाठी तलावाकडे गेले होते. दुपारची वेळ असल्याने पोहण्यासाठी ही मुलं पाण्यात उतरली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचाही बुडून मृत्यू झाला आहे.
जीवन भगत (वय 10 वर्ष), रोशन भगत (वय 9 वर्ष), रोहन आडाखे (वय 12 वर्ष) आणि आशुतोष बेलखडे (वय 15 वर्ष) अशी मृत चौघांची नावं आहेत.
या प्रकारामुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.