Washim Accident News :  वाशिमच्या लाखी इथं भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बोलेरो पीकअप वरील नियंत्रण सुटल्यानं एका महिलेला उडवले आहे. तर दोन मुली थोडक्यात बचावल्या आहेत. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो पिकअपचा चालक दारुच्या नशेत गाडी चालवत होता अशी माहिती मिळाली आहे. 

Continues below advertisement

भीषण अपघाताचा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

वाशिमच्या लाखी इथ भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका महिलेला धडक देत त्या महिलेला उडवल्याची घटना घडली आहे. दरम्यान, त्याच महिलेच्या बाजूला असलेल्या दोन मुली पैकी एक मुलगी थोडक्यात बचावली आहे. या भीषण अपघाताचा प्रसंग एका  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बोलेरो पिकअपचा चालक दारुच्या नशेत गाडी चालवत होता अशी माहिती मिळत आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. तर दोन शाळकरी मुली सुदैवाने या अपघातातून बचावल्या आहेत. 

नाशिकच्या पुणे रोडवर शिंदे टोल नाक्यावर एसटी महामंडळाच्या बसला भीषण आग

नाशिकच्या पुणे रोडवर शिंदे टोल नाक्यावर एसटी महामंडळाच्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे. शहरातील शिंदे टोल नाका परिसरात बसला आग लागल्याने खळबळ उडाली आहे. बसमध्ये 16 प्रवासी होते. मात्र आगीची माहिती मिळताच बस ड्रायव्हरने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. ड्रायव्हरच्या दक्षतेमुळं मोठा अनर्थ टळला आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सोलापूर-नाशिक बसमध्ये 15 प्रवासी होते. सगळे प्रवाशी सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे. तर ही बस जळून खाक झाली आहे. 

Continues below advertisement

रायगड जिल्ह्यात भीषण अपघात, 21 जणांना घेऊन जाणारा पिकअप पलटी, एकाचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात भीषण रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. नमाज अदा करण्यासाठी जात असताना 21 जणांना घेऊन जाणारा पिकअप टेम्पो पलटी झाल्यामुळे एक जण जागीच मृत्यूमुखी पडला, तर 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात अलिबाग तालुक्यातील बोरघर पुलाजवळ घडला असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

Alibag Accident News : वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, गेल कंपनीमध्ये काम करणारे काही कामगार नमाज अदा करण्यासाठी अलिबाग तालुक्यातील रामराज येथे जात होते. यावेळी त्यांना घेऊन जाणारा पिकअप टेम्पो अचानक चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं रस्त्यावर पलटी झाला. या वाहनात एकूण 21 जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.