एक्स्प्लोर

Wardha News : वर्ध्याच्या आर्वीत रेबीजग्रस्त कुत्र्याचा थैमान! सहा लहान मुलांसह अठरा जणांना चावा, उपचारदरम्यान चिमुकल्याचा मृत्यू

Wardha News : वर्ध्याच्या आर्वी शहरातील स्टेशन वॉर्ड परिसरात रेबीजग्रस्त कुत्र्याने हैदोस घालत सहा लहान मुलांसह तब्बल 18 जणांना चावा घेतला. तर या हल्ल्यात गंभीर जखमी बालकाचा उपचारार्थ मृत्यू झाला आहे.

Wardha News : वर्ध्याच्या आर्वी शहरातील स्टेशन वॉर्ड परिसरात रेबीजग्रस्त कुत्र्याने हैदोस घालत सहा लहान मुलांसह तब्बल 18 जणांना चावा घेतला. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असताना गंभीर जखमी असलेल्या बालक धवल गजानन गुल्हाने (वय 13 वर्ष रा. भाकरे ले आउट) याचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शहरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मोकाट कुत्र्यांवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Gadchiroli Crime : खंडणी मागणाऱ्या तोतया पोलिसाला अटक; इंजिनियर तरुणाला गडचिरोलीत अटक

गडचिरोली पोलीस अधिकारी असल्याचे सांगत खंडणी वसुली करणाऱ्या तोतया पोलिसाला अहिल्यानगर पोलिसांनी एकाला गडचिरोली जिल्ह्यातून अटक केली आहे. चंदन सांगळे असे आरोपीचे नाव आहे. मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी असलेला चंदन हा अहिल्या नगर येथील एका व्यक्तीला फोन करून आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून 5 लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी नगर पोलिसात तक्रार दाखल करतात पोलिसांनी आरोपीचा छडा लावला. अहिल्यानगर पोलीस आपल्याला अटक करण्यासाठी येत असल्याची कुणकुण लागतात आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. चंदन हा अभियांत्रिकी पदवीधर असून तो इंटरनेटवरून व्यावसायिक आणि हॉटेल चालकांचे नंबर मिळवायचा. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत खंडणी वसूल करायचा. यापूर्वीही त्याच्यावर रत्नागिरी, गोंदिया जिल्ह्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

Bhandara Police : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपीच पलायन

मध्यप्रदेशातील खैरलांजी पोलिसांच्या पथकाला भंडारा जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे. एका गुन्ह्यातील तपासासाठी आणि ट्रॅक्टर जप्त करण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपीनं पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील खैरलांजी पोलीस स्टेशन हद्दीत एका गुन्ह्याची नोंद होती. या प्रकरणातील संशयित आरोपी विमल उर्फ शालू दशहरे याला ताब्यात घेऊन पोलीस पथक भंडारा जिल्ह्यात ट्रॅक्टर जप्त करण्याच्या मोहिमेवर आले होते. दिवसभराच्या कामानंतर, रात्रीच्या सुमारास कारधा पोलीस स्टेशन हद्दीतील धारगाव येथील 'गोवा फॅमिली रेस्टॉरंट' मध्ये सर्वजण जेवणासाठी थांबले होते. जेवण आटोपल्यानंतर तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक (PSI) दीपक गौतम हे हॉटेलच्या काउंटरवर बिल भरण्यासाठी गेले. याच क्षणाचा फायदा घेत, पोलिसांच्या तावडीतील आरोपी विमल उर्फ शालू दशहरे (३५) याने अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या तावडीतून पलायन केले. काही क्षणातच तो नजरेआड झाल्यानं पोलीस पथकाची मोठी धावपळ उडाली. याप्रकरणी दीपक गौतम यांनी कारधा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या घटनेमुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. सध्या भंडारा पोलीस आणि मध्यप्रदेश पोलीस संयुक्तपणे फरार आरोपीचा शोध घेत आहेत. हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केली जात आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane: कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य
कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य
Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांमध्ये संतप्त भावना
महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही, पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले; भाविकांमध्ये संतप्त भावना
Maharashtra Live blog updates: आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
Embed widget