Wardha Accident News : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील खडकी इथं कारचा भीषण अपघात (Car Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला तर एका पंचवीस वर्षीय युवकाचा समावेश आहे. वर्ध्याहून नागपूरला जात असताना हा अपघात झाला आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने भरधाव येणाऱ्या ट्रकला धडकल्यानं हा अपघात झाला.
या भीषण अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले आहेत. ही घटना तुळजापूर नागपूर मार्गावर खडकी नजीक सामाजिक वनिकारणच्या नर्सरीजवळ घडली आहे. वर्ध्याच्या जुनघरे परिवारातील सदस्य हे नागपूर येथे कारने जात असताना हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोन महिला तर एक पंचवीस वर्षाचा तरुण अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात श्वविच्छेदणासाठी पाठवण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी