Beed : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात कारागृहात असलेल्या वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आज निर्णय होणार होता. आरोपींचे वकील गैरहजर होते त्यामुळे पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे..त्यामुळे जामीन अर्ज आणि दोष मुक्तीच्या अर्जावर 10 सप्टेंबर रोजी निर्णय होईल. आज जामीन अर्ज आणि दोष मुक्तीच्या अर्जाबाबत निर्णय होण्याची अपेक्षा होती. मात्र वकील गैरहजर होते. ही केस चार्ज फ्रेम झाली पाहिजे अशी आशा बाळगत आहे. मात्र वेळ जात आहे. आता दहा तारखे नंतर अपेक्षा आहे.. असं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले .
पुढील सुनावणी आता 10 सप्टेंबरला
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपींचे जामीन आणि दोषमुक्ती अर्ज अद्याप निकाली लागलेले नाहीत. आज न्यायालयात झालेल्या सुनावणीत काही आरोपींच्या अर्जांवर निर्णय राखून ठेवण्यात आला. तर काही अर्जांबाबत मूळ फिर्यादीचे म्हणणे न्यायालयासमोर न आल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.या खटल्यातील महत्त्वाचा आरोपी वाल्मिक कराड याच्या जामिनाबाबत देखील पुढील सुनावणी आता 10 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे कराडला जामीन मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात अनेक जण आरोपी म्हणून अडकले असून, काहींनी दोषमुक्तीची मागणी तर काहींनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. आजच्या सुनावणीनंतर पुन्हा एकदा हा खटला चर्चेत आला असून, पुढील तारखेला होणाऱ्या सुनावणीवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
काय म्हणाले धनंजय देशमुख ?
न्यायालयात सर्व म्हणणे मांडण्यात आले आहे. त्यावर न्यायालय काय निर्णय देते. हे महत्त्वाचे आहे. कृष्णा आंधळे प्रशासनाच्या विचारातून गेला आहे. त्याचा काहीही थांग पत्ता लागायला तयार नाही..सर्व पथक त्याच्या मागावर आहेत. मात्र तो कुठे जाऊन बसला आहे. हे प्रश्नचिन्ह उभ राहिल आहे.तपास अधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा करणार आहे. आरोपी सगळे एकच आहेत आरोपींची ही टोळी आहे. संगणमताने हे सर्व करायचे. सर्व आरोपींना एवढा मोठा फौज फाटा किंवा एवढी मोठी यंत्रणा राबवली गेली नसती..कराडच्या संपत्ती जप्तीबाबत अर्ज निकाली निघेल. त्यादिवशी सर्व प्रश्नांची उत्तर स्पष्टीकरणासहित देईल..असेही धनंजय देशमुख म्हणाले.