राज्याच्या राज्यपाल पदी बसलेल्या एका विक्षिप्त माणसामुळे अनेक अडचणी येत आहेत, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. सांगली जिल्ह्यातील कृषी विद्यालयाच्या मागणीवरुन बोलताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांचा हवाला दिला. त्या म्हणाल्या की, "इथे कृषी कॉलेज सुरु झालं पाहिले अशी मागणी होती. दादांनी मला सांगितलं आहे, एक विक्षिप्त असा माणूस राज्याच्या गव्हर्नरपदी बसला आहे. मीडियावाल्यांना दाखवायचं असेल दाखवू शकतात.
पण आपण संविधानाने जोडले गेलो आहोत आणि संविधानावर प्रश्न निर्माण करुन मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणारा माणूस राज्यपाल म्हणून बसला आहे. अडथळे ते आणत आहेत म्हणून या कृषी विद्यालये होत नाहीत ही वास्तविकता आहे, असा आरोपही यशोमती ठाकूर यांनी यावेळी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर केला.