मुंबई : अयोद्धा (Ayodhya) नगरी रामरायाच्या प्राण प्रतिष्ठापनेकरिता सज्ज झालीये. महाराष्ट्रात मात्र, सध्या अयोद्धेतील सोहळ्याच्या निमंत्रणावरुन राजकीय वाद सुरु झालाय. सूत्रांकडून व्हीव्हीआयपी (VVIP) निमंत्रितांची यादी तयार असून लवकरच  निमंत्रणे श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र मंदिर समितीकडून पोहोच केली जाणार असल्याचं कळतंय. या व्हिव्हिआयपी यादीत कोणाकोणाचा समावेश आहे? आणि प्रत्यक्ष या सोहळ्यात कोण उपस्थित राहणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.


महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळणार का? काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी निमंत्रणानंतरही अयोद्धेचा सोहळा टाळणार का? अयोद्धेत उद्धव आणि राज हे दोन्ही ठाकरे दिसणार का? शरद पवार अयोद्धेत दिसणार का? असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या 22 तारखेला प्रत्यक्षात मिळतीलच. मात्र, सध्या पडद्याआड बऱ्याच घडामोडी घडतायेत. एकीकडे सोहळ्याच्या तयारीची आणि  निमंत्रणांची धांदल उडालीय तर दुसरीकडे निमंत्रणांवरुन राजकिय गोंधळही उडालाय. त्यामुळे आता या सोहळ्याला कोणाची हजेरी लागणार आणि कोण पाठ फिरवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


 साडेतीनशे व्हीव्हीआयपींना निमंत्रण


काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधींना निमंत्रण देण्यात आलं आहे. पण अजूनही शरद पवार यांना अजूनही निमंत्रण पोहचले नाही. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना सुद्धा या सोहळ्याचं  निमंत्रण पाठवलं असून लवकरच त्यांना निमंत्रण पोहोच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. आतापर्यंत सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला निमंत्रण मिळाले आहे. अयोद्धेत 22 जानेवारी रोजी लाखोंची गर्दी होणार आहे. त्यामध्ये देशातील विविध पक्षांचे प्रमुख, सेलिब्रिटीही असणार आहेत. हा सोहळा डोळ्यांत साठवण्याकरिता देशातला प्रत्येक रामभक्त तिथं शरिरानं किंवा मनानं हजर असणारच.


22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मुंबईतील जवळपास साडेतीनशे व्हीव्हीआयपींना निमंत्रण देण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी मुंबईतून निमंत्रित असलेल्या व्हीव्हीआयपींची यादी देखील तयार करण्यात आलीये. यामध्ये मुंबईतील संत महंत, राजकीय पक्षाचे पक्षप्रमुख अध्यक्ष, खेळाडू, चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार, मोठे उद्योगपती त्याचप्रमाणे महत्त्वाचे काही सेलिब्रिटीज यांना देखील निमंत्रण दिले जाईल. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या या नावाने सर्वांना निमंत्रण पाठवले जाणार असून  यासाठी प्रचारक म्हणून जबाबदाऱ्यांचे वाटप सुद्धा करण्यात आलं आहे


 


हेही वाचा : 


Ram Mandir : राम मंदिराचे डिझायनर आहेत तरी कोण, रचना कोणत्या शैलीत करण्यात आली? मॉडेल कसे तयार झाले??