मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (MPSC) नवे अध्यक्ष मिळाले असून, ज्येष्ठ आयएएस अधिकारी विवेक लक्ष्मीकांत भीमनवार यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला आहे. विवेक भीमनवार यांना प्रशासकीय सेवेचे प्रदीर्घ अनुभव आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, नवीन अध्यक्षांनी कार्यभार स्वीकारेपर्यंत आयोगाचे सदस्य डॉ. अभय एकनाथ वाघ यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आली आहे.

Vivek Bhimanwar IAS Profile : कोण आहेत विवेक लक्ष्मीकांत भीमनवार?

विवेक भीमनवार हे महाराष्ट्र कॅडरचे 2009 बॅचचे आयएएस अधिकारी असून, प्रशासकीय सेवेत त्यांचा भक्कम अनुभव आहे. त्यांनी प्रशासकीय क्षेत्रात येण्यापूर्वी एलएलबी आणि एमएससी या उच्च शिक्षणाची पदवी प्राप्त केली आहे.

Continues below advertisement

विवेक भीमनवार महाराष्ट्र शासनात परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात परिवहन विभागात अनेक सुधारणा आणि नागरिकाभिमुख उपक्रम राबवण्यात आले. विशेषतः प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी मुंबई महानगर प्रदेशातील बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर कठोर कारवाई करत प्रशासकीय धाडस दाखवले होते.

MPSC साठी महत्त्वाची नियुक्ती

स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि प्रशासनात गुणवत्ता टिकवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. विवेक भीमनवार यांचा अनुभव आणि कार्यशैली आयोगाच्या कामकाजाला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही बातमी वाचा: