Virar News : पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिमेत दोन तरुणांची तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही तरुण एकमेकांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. या घटनेदरम्यान परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.प्राथमिक माहितीनुसार, किरकोळ कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.

परिसरात काही काळ तणावाचे वातावरण

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला आहे. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आहे. या घटनेमुळं परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

नांदेडमध्ये गुन्हेगारीचे सत्र सुरुच, पैशाच्या वादातून दोन गटात हाणामारी

नांदेड जिल्ह्यात तीन दिवसांत पाच खून झाल्याची घटना ताजी असतानाच आज हिमायतनगर येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. पैशांच्या व्यवहारातून वाद निर्माण होऊन दोन गटांमध्ये राडा झाला आहे. यावेळी एकमेकांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अधिक गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.