Virar Accident News :  विरार आणि वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. चेन्नई–अहमदाबाद एक्सप्रेससमोर अज्ञात व्यक्ती आल्याने गंभीर रेल्वे अपघात झाला आहे. या अपघातात संबंधित व्यक्ती गाडीच्या समोरील जाळीत अडकली. त्यामुळे एक्सप्रेस थांबवावी लागली. या अपघातात अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Continues below advertisement

डहाणू व गुजरातकडे जाणाऱ्या अनेक गाड्या खोळंबल्या

या घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या डाऊन मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली. डहाणू व गुजरातकडे जाणाऱ्या अनेक गाड्या खोळंबल्या, तर काही लोकल गाड्याही मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासन व अग्निशामक दलाने मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.  वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 35 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी

 
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. शिरपूरकडून सप्तशृंगी गडाकडे पायी जाणाऱ्या भाविकांना चार चाकी वाहनाने चिरडल्याने या अपघातात एका 35 वर्षीय महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू तर दोन भाविक गंभीरित्या जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी करण्यात दाखल करण्यात आले आहे. जखमींची आमदार काशीराम पावरा यांनी तात्काळ रुग्णालयात पोहोचून पाहणी केली आहे. शिरपूर तालुक्यातील दहिवद फाटा येथे मुंबई आग्रा महामार्गावरील ही दुर्घटना घडली आहे.  मध्यप्रदेश कडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनाने भाविकांना चिरडले आहे. 

साकीनाका पोलिसांच्या नव्या कोऱ्या गाडीला अचानक आग

साकीनाका पोलिसांच्या नव्या कोऱ्या गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. साकीनाका पोलीस ठाण्याची नवी कोरी गस्तीसाठी असलेली गाडी सफेद पूल येथे आली असता अचानक गाडीच्या बॅटरी जवळ आग लागली. गाडीतील चालकाने बाहेर उडी घेतल्याने जीवितहानी टळली आहे. आज दुपारी घटना घडली आहे. 

Continues below advertisement