विरार : विरारच्या (Virar Accident Video) अर्नाळा गावात पळत सुटलेल्या एका लहान मुलाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण अपघात cctv कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शुक्रवारी सकाळी अर्नाळा कोळीवाडा किल्ला रोड ते पारनाका या मुख्य रस्त्यावर ही घटना घडली आहे. तीन मुलं मुख्य रस्त्याकडे पळत येत असताना एक मुलगा वेगात येणाऱ्या स्कुटी वर आदळून, समोर येणाऱ्या रिक्षाच्या समोरील चकाखाली आला. दैव बलवत्तर म्हणून मुलगा वाचला असून तो किरकोळ जखमी झाला आहे. स्थानिकांनी मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास अर्नाळा कोळीवाडा किल्ला रोड ते पारनाका या मुख्य रस्त्यावर ही घटना घडली आहे. तीन मुले मुख्य रस्त्याकडे पळत येत असताना एक मुलगा वेगात येणाऱ्या स्कुटीवर आदळून समोर येणाऱ्या रिक्षाच्या समोरील चकाखाली आला आहे. सुदैवाने यात दैव बलवत्तर म्हणून मुलगा वाचला असून त्याला किरकोळ जखमी झाला आहे. स्थानिकांनी मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.सध्या अपघाताचा cctv सोशल मीडियावर व्हायरल होत असून मुलाची ओळख पटली नाही. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष द्यावे असे आवहान स्थानिक गावकऱ्यांनी केले आहे.
रस्ता सुरक्षेविषयी मुलांना माहिती देणे आवश्यक
रस्त्यावरील अपघातांमुळे दररोज शेकडो मुले जखमी होतात. रस्ता सुरक्षेच्या नियमांची माहिती नसणे आणि निष्काळजीपणा ही या परिस्थितीमागची प्रमुख कारणे आहेत. असे अपघात टाळण्यासाठी पालकांनी घरी आणि शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेविषयी माहिती देणे आवश्यक आहे. तसेच. जे विद्यार्थी शाळेत चालत जातात किंवा ज्यांना स्कूल बसच्या पिकअप किंवा ड्रॉपिंग पॉईंटमधून रस्ता ओलांडायचा आहे, त्यांना रस्ता सुरक्षितपणे कसा ओलांडायचा ते शिकवले पाहिजे. मुले चालताना पालकांसोबत असली तरी पादचारी क्रॉसिंगवरुनच रस्ता ओलांडला पाहिजे.
रस्त्यांवरुन चालताना त्यांना कधीही रस्त्यांवरुन जाताना धावू नका तर हळू चालण्यास सांगा. मुलांचे शेजारच्या मित्रांसोबत खेळणे आणि संध्याकाळी उशिरा एकटे घरी येणे हे अगदी सामान्य आहे. कुटुंबातील एखादा सदस्य किंवा मित्र रस्त्यामध्ये कुठेही असला तरी त्याच्याकडे धावत जाण्याची घाई अति उत्साहीपणा मुले करतात. अशा वेळी अपघाताची शक्यता असते. म्हणून मुलांना घाई न करता व्यवस्थित रहदारिचा अंदाज घेण्यास व शांत राहण्यास सांगणे महत्वाचे आहे.