Beed News : बीडच्या नांदूरघाटमध्ये इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनात नियमांचं उल्लंघन केल्यानं आयोजक सुमंत धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. काल (सोमवारी) मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी नांदूर घाटमध्ये इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम घेतला होता. ज्याला मोठी गर्दी झाली होती. कोरोनाचे सगळे नियम या ठिकाणी मोडण्यात आले होते. म्हणून प्रशासनाने कालच्या सोहळ्याचे आयोजक मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्यावर जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी 188 प्रमाणे केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याबरोबरच कोरोना काळात गर्दी जमवल्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे मोठ्या सभा होतात आणि मनसेच्याच कार्यक्रमावर कारवाई का? असा सवाल सुमंत धस यांनी केला आहे.
निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रचारसभा सुरू, तरीही आमच्याच धार्मिक कार्यक्रमांवर कारवाई का? सुमंत धस यांचा सवाल
मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमन धस यांच्यावरती निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन सोहळा गर्दी भरवून घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात सुमंत धस यांनी प्रशासनालाच प्रश्न विचारले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे प्रचारसभा एवढ्या जोरात सुरू असताना तिथे पोलीस कोणतीच कारवाई करत नाहीत, पण आम्ही मात्र कीर्तन सोहळा घेतला की, आमच्यावर कारवाई केली यासोबतच जर राजकीय सभांना एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी चालत असेल, तर आमच्या धार्मिक कार्यक्रमाला ही परवानगी द्या, अशी मागणी सुमंत धस यांनी केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
- पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात गुन्हेगारांचा राडा, हातात धारधार हत्यारे घेऊन घातला नंगानाच
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह