Vijaysinh Pandit on  Laxman Hake :  लक्ष्मण हाके (Laxman Hake) ही व्यक्ती ओबीसी नेता नाही, हा ओबीसी नेता तुम्ही लोकांनी केला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित (Vijaysinh Pandit) यांनी केली. नेहमी कुठेही जायचं आणि वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करायचा माकड चाळे करायचे. काहीतरी बुद्धीभेद करुन समाजामध्ये तेड कशी निर्माण होईल असा प्रयत्न या महाशयांचा असतो असे हाके म्हणाले. त्याचप्रमाणे कालही गेवराई शहरांमध्ये जाऊन त्यांनी तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बाचाबाची वगैरे काही झाली नाही त्याला पिठाळून लावल्याचे पंडित म्हणाले. मी ठरवलं असतं तर गेवराई काय बीड जिल्ह्यात देखील येऊ शकला नसता असेही विजयसिंह पंडित म्हणाले. 

Continues below advertisement


समाज बांधव म्हणून संघर्ष योद्धा म्हणून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा 


मराठा आणि ओबीसी वाद बिलकुल नाही आहे, ही जी काही आपोआप प्रवृत्ती आहे, महाराष्ट्रात ज्याला कोणीही विचारत नाही अशा या श्वानाला पायबंद घालण्याचं काम सामान्य तरुणांनी केल्याचे विजयसिंह पंडित म्हणाले. मी जे बॅनर लावलं त्या बॅनरवर काय चुकीचं आहे. समाज बांधव म्हणून माझा संघर्ष योद्धा म्हणून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मला मार्गदर्शन करणारा हा बाजारु कोण आहे? असा सवाल करत पंडित यांनी लक्ष्मण हाकेंवर टीका केली.


यापूर्वी देखील वंचितच्या उमेदवाराकडून पैसे घेऊन माझ्या विरोधात हा व्यक्ती ठाण मांडून बसला होता अस विजयसिंह पंडित म्हणाले. त्याचा परिणाम काय झाला हे माहिती नसेल तर सांगतो. तिथे त्याने जो उमेदवार उभा केला बुद्धिभेद केला मराठा विरुद्ध ओबीसी मतभेद केला त्या उमेदवाराचा डिपॉझिट जप्त झाले. माझ्या विरोधात उभा राहत असेल तर मी स्वागत करतो असे विजयसिंह पंडित म्हणाले. 


गेवराईत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित समर्थकांत राडा 


मनोज जरांगे पाटील  (Manoj Jarange Patil)  यांच्या आंदोलनापूर्वीच काल (25 ऑगस्ट) बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित समर्थकांत राडा झाला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी आज मध्यरात्रीपासूनच बीड जिल्ह्यात पुढील पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. पुढील पंधरा दिवस कुठलेही आंदोलन निदर्शने होणार नाहीत. एवढेच नाही तर पाच पेक्षा अधिक जमाव एकत्रित येण्यास देखील मज्जाव घालण्यात आला आहे. या दरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई झुगारण्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील पोलीस प्रशासनाने दिला आहे.


महत्वाच्या बातम्या:


Georai News: गेवराईतील हाके-पंडित समर्थकांचा राड्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट; जमावबंदी आदेश जारी, पुढील 15 दिवस आंदोलन अन् निदर्शनावर बंदी