Rupali Thombre : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहलं आहे. रुपाली ठोंबरे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून विधान परिषदेवर संधी देण्याची विनंती केली आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलंय?
राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या एकमेव विधान परिषद जागेसाठी रुपाली ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहलं आहे. रुपाली ठोंबरे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून विधान परिषदेवर संधी देण्याची विनंती केली आहे. मागील 20 वर्षापासून राजकारणात सक्रिय असून विधान परिषदेच्या जागेवर संधी मिळावी अशी सुनेत्रा पवार यांना विनंती केली आहे. माजी नगरसेविका, शहर सुधारणा समिती अध्यक्ष म्हणून अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. पदवीधर निवडणूक लढवताना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे रुपाली ठोंबरे यांनी सांगितले. जनतेच्या मुद्यावर ठाम आणि आक्रम भूमिका घेत आहे.अन्यायाविरोधात मी नेहमीच ठामपणे उभी राहिली आहे. समाजातील दुर्बल घटकांचा आवाजन बनण्याचे काम मी केल्याचा उल्ले रुपाली ठोंबरे यांनी पत्रात केला आहे.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार असून ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं वक्तव्य केलंय.
विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार 1. उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा)
2. नीलम गोऱ्हे (शिवसेना)
3. शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट)
4. अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट)
5. गोपीचंद पडळकर (भाजप)
6. रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
7. राजेश राठोड (काँग्रेस)
8. प्रवीण दटके (भाजप)
9. रमेश कराड (भाजप)
28 मतांचा कोटा आवश्यक
दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.