Vidarbha Rain Update : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच पर्लकोटा नदीला आलेल्या पुराचे पाणी मंगळवारी भामरागड शहरातील 25 ते 30 दुकान आणि घरांमध्ये शिरले होते. आज मात्र पूर ओसरायला सुरुवात झाली असून शहरातील पाणी ओसरले आहे. मात्र पुलावर आताही पाणी असल्यामुळे भामरागड-आल्लापल्ली हा मार्ग सध्या बंदच आहे. तर जिल्ह्यातील इतर 10 मार्गही बंद आहेत.

Continues below advertisement


अशातच नाला ओलांडण्याच्या प्रयत्नात पुरात वाहून गेल्याने एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भामरागड तालुक्यात घडली आहे. असन्तु सोमा तलांडी रा. जोनावाही, असे त्या शिक्षकाचे नाव आहे. तलांडी हे पल्ले येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते शाळा सुटल्यावर गावाकडे निघाले असताना नाला ओलांडताना सिपनपल्ली नाल्यात ते वाहून गेले. अशीच घटना सोमवारी घडली होती. पुरातून रस्ता ओलांडताना कोडपे गावातील 19 वर्षीय युवक वाहून गेला होता.


भर पावसात दुचाकीवर बसून कृषीमंत्री दत्तात्रय भरणे पोहचले शेतकऱ्यांचा बांध्यावर


राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे वाशीमच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भर पावसात दुचाकीवर बसून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी केली.


राज्यात अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान नांदेड आणि वाशिम जिल्ह्यात झालं आहे. यात 350 गावांच नुकसान झालं आहे. तर यात 4 लाख 11 हजार एकरच नुकसान झालं आहे. एक-दोन ठिकाणी मनुष्यहानी झाली आहे. हीच अतिवृष्टीने नुकसान झालेल्याची पाहणी करण्यासाठी मी आज वाशिम जिल्ह्यात आलो आहे. आज सर्वत्र नुकसानीची पाहणी करून याचा अहवाल मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्रीं यांना देणार आहे, त्यानंतर ते निर्णय घेऊन मदत देतील. केंद्र सरकारकडे सुद्धा शेतकऱ्यांना मदतीसाठी मागणी करणार आहे. अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.


वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या रिसोड तालुक्यातील महागाव,बाळखेड, वाकद, शेलू खडसे, मसलापेन त्यानंतर मालेगाव तालुक्यातील राजुरा तर मंगरूळपीर तालुक्यात शेलूबाजार आणि वाशिम इथ भेट देत दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली आहे. त्यानंतर ते जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी संदर्भात बैठक घेणार आहेत.


विदर्भात पावसामुळे कुठे किती नुकसान?


बुलढाणा


-बुलढाणा जिल्ह्यात 78 हजार हेक्टर वरील पिके नष्ट.


-6 जनावरे वाहून गेलीत.


-एका व्यक्तीचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू.


-चार मार्गावरील पुरामुळे पुलाच नुकसान.


-341 गावे बाधित.


यवतमाळ


- जिल्ह्यात 90 हजार 924 हेक्टरवरील पिकांचे नुकसान


- 47 लहान-मोठे जनावरांचा मृत्यू.


- 3 व्यक्तीचा पुरात आणि वीज पडून मृत्यू.


- बाधित गावे- 640


आणखी वाचा