एक्स्प्लोर

Vidarbha Rain Deficit Issue: पावसाची हुलकावणी; बळीराजाच्या डोळ्यात पाणी; विदर्भात तब्बल 58 टक्के पावसाची तूट; संत्र्यासह धान पिकांना मोठा फटका

Vidarbha Rain Deficit Issue Hit Farmers : संत्रा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यत हि तूट 71 टक्के व अमरावती जिल्यात 82 टक्के आहे. त्याचा परिणाम संत्रा पिकावर पडला आहे.

Vidarbha Rain विदर्भाच्या दृष्टीने संपूर्ण आगस्ट महिना हा दुष्काळी महिना ठरला आहे. एकट्या आगस्ट महिण्यात विदर्भात पावसाची तूट (Vidarbha Rain Deficit)  हि 58 टक्के नोंदविली गेली. संत्रा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यत हि तूट 71 टक्के व अमरावती जिल्यात 82 टक्के आहे. त्याचा परिणाम संत्रा पिकावर पडला आहे. मुबलक पाऊस न झाल्यामुळे संत्र्याची  (Orange Crops) मोठ्या प्रमाणात गळ सुरु झाली आहे. मागच्या दोन आठवड्या 25 ते 30 टक्के झाडावरचा बहर गळून पडला आहे. भविष्यत पाऊस आला नाही तर हि गळ 80 टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यातच एक महिण्यापासून असलेले सलगचे ढगाळ वातावरण त्यामुळे संत्रा पिकाला बुरशीजन्य रोगाची लागण झाल्याने हि गळ वेगाने होत आहे.

Vidarbha Rain Deficit Issue: दुष्काळी आगस्ट महिना; विदर्भात तब्बल 58 टक्के पावसाची तूट

या वर्षीचा आगस्ट महिना अक्षरशः दुष्कळी महिना ठरला आहे. परिणामी त्याचा परिणाम पिकांवर आणि जलसाठ्यावर झाल्याचे दिसून येतंय. 1 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत विदर्भात केवळ 125.5 मिमी पाऊस नोंदविण्यात आला. या कालावधीत विदर्भाची सरासरी पर्जन्यमानाची अपेक्षा 297.1 मिमी होती. त्यामुळे ऑगस्टमध्ये विदर्भात तब्बल 58 टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. ऑगस्टमधील पावसाची सर्वाधिक तूट अकोला जिल्ह्यात 84 टक्के असून, तेथे केवळ 33.5 मिमी पाऊस झालाय. अमरावतीत 46.4 मिमी पावसासह 82 टक्के, तर यवतमाळमध्ये 54.1 मिमी पावसासह 78 टक्के तूट राहिलीय.

नागपूर जिल्ह्यातही ऑगस्टमध्ये पावसाची मोठी कमतरता; केवळ 83.6 मिमी पाऊस

नागपूर जिल्ह्यातही ऑगस्टमध्ये पावसाची मोठी कमतरता राहिली. जिल्ह्यात केवळ 83.6 मिमी पाऊस झाला असून, सरासरी 286.4 मिमीच्या तुलनेत 71 टक्के तूट नोंदविण्यात आली. वर्धा जिल्ह्यात 65.5 मिमी पाऊस झाला असून तूट 73 टक्के, तर वाशिममध्ये 62.6 मिमी पावसासह 71 टक्के तूट राहिली आहे. चंद्रपूरमध्ये 159 मिमी पाऊस झाला असून तूट 55 टक्के, बुलढाण्यात 76.1 मिमी पावसासह 61 टक्के, तर भंडाऱ्यात 207 मिमी पाऊस झाला असून तूट 43 टक्के आहे. तुलनेने गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत ऑगस्टमधील पावसाची स्थिती काहीशी चांगली राहिली. गडचिरोलीत 293.6 मिमी पाऊस झाला असून तूट 32 टक्के, तर गोंदियात 295 मिमी पाऊस झाला असून तूट 28 टक्के आहे.

पश्चिम विदर्भासह उर्वरित जिल्ह्यात पिकांची अंत्यत दयनीय अवस्था, विदर्भातील धरणांमध्ये सुमारे 62 टक्के जलसाठा

यामुळे पश्चिम विदर्भासह उर्वरित पिकांची अंत्यत दयनीय अवस्था आहे. संत्रा, उडीद, मुंग, काही भागात कपाशी, सोयाबीन पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 3 सप्टेंबर 2026 रोजी विदर्भातील धरणांमध्ये सुमारे 62 टक्के जलसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील धरणांचा जलसाठा 63.06 टक्के, तर अमरावती विभागातील धरणांमध्ये 63.04 टक्के पाणीसाठा आहे.

Gondia: ढगाळ वातावरणाचा धान पिकाला फटका; रोगकिडींचा प्रादुर्भाव वाढला

गोंदिया जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आणि अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे धान पिकावर रोगकिडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगकिडींमुळे धानाच्या रोपांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रोगकिडींचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी शेतात कीटकनाशकांची फवारणी करताना दिसून येत आहेत. परिणामी, हातातोंडाशी आलेले धानाचे पीक खोडकीडीमुळे वाया जाऊ नये, यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget