मुंबई : महंगाई डायन खाये जात है, हेच गाणं म्हणायची वेळ आता गरिबांवर आली आहे. कारण देखील तेच आहे. सरकारने कितीही दावे केले की महागाई आटोक्यात आहे, तरी वास्तव काही वेगळंच आहे. या महागाईत सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. कांदा, बटाटा, तेल, राई, जिरे, पालेभाज्या, फळभाज्या, फळे या सर्वांची किंमत 4 ते 5 पट महाग झाली आहे. आणि त्यावर सरकारचे काहीही नियंत्रण नाहीये. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबियांना आता जगावे की मरावे असा प्रश्न पडलाय.


कोरोनाकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जास्तीतजास्त हिरव्या पालेभाज्या खाव्यात, असा सल्ला तज्ज्ञ देतात. मात्र, मार्केटमध्ये गेल्यावर भाज्यांचे भाव ऐकून अक्षरशः चक्कर येणं बाकी राहातं. अपवाद वगळता सर्वच भाज्या महागल्या आहेत. तुटपुंज्या बजेटमध्ये ताळमेळ बसविताना गृहिणींची मोठी कसरत होत आहे.


कोरोनामुळे रोजगार जाऊन आर्थिक चणचण वाढली आहे. तर दुसरीकडे वाढत्या महागाईला तोंड देताना सामान्यांचे हाल होत आहेत. डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने डाळींच्या किमती वाढल्याचे कारण सांगितले जात आहे. तर तेलाचे देखील दर वाढले आहेत.


असे आहेत भाजीपाला, फळांचे दर
बटाटा - 35 ते 40 रु किलो
कांदे - 35 ते 45 रु किलो
टोमॅटो - 30 ते 40 रु किलो
लवंगी मिरची - 80 रु किलो
आलं - 160 रु किलो
लसूण - 160 रु किलो


वाटणे - 100 ते 120 रु किलो
कोबी - 40 ते 50 रु किलो
मोठे वांगे - 40 रु किलो
छोटी वांगी - 50 रु किलो
फ्लॉवर - 50 ते 60 रु किलो
शिमला मिरची - 80 रु किलो
काकडी - 30 रु किलो
दुधी - 25 ते 40 रु किलो
शिराळे - 60 रु किलो
कारली - 50 रु किलो
भेंडी - 25 ते 30 रु किलो
गवार - 60 ते 80 रु किलो
फरसबी - 40 ते 50 रु किलो
गाजर - 20 ते 30 रु किलो
भोपळा - 20 ते 30 रु किलो
सुरण - 25 ते 30 रु किलो
तोंडली - 40 ते 50 रु किलो


पालक - 15 ते 20 रु जुडी
लाल माठ - 10 ते 15 रु जुडी
कोथिंबीर - 25 रु जुडी