बीड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बीड जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. पण याच निर्णयाच्या विरोधात माजलगावमध्ये मात्र संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाला थेट रस्त्यावर फेकून दिला आहे. 


बुधवारी माजलगाव येथील आठवडी बाजार असल्याने परिसरातील भाजीविक्रेते माजलगाव शहरात भाजीविक्रिसाठी आले होते. पण त्यावेळी त्यांना प्रशासनाच्यावतीने आठवडी बाजार बंद असल्याचे सांगण्यात आले आणि भाजी विक्री करण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या या भाजी विक्रेत्यांनी चक्क आपल्या भाज्या रस्त्यावर फेकून दिल्या. त्यामुळे माजलगावातील मुख्य रस्त्यावर भाज्यांचा सडा पडलेला पाहायला मिळालं. 


महाराष्ट्रात 39 हजार 207 नवे रुग्ण


राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाच्या 39 हजार 207  नव्या रुग्णांची भर झाली असून 53 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच 38, 824 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या आधी रुग्णसंख्या 40 हजारांच्या वर असायची, त्यात आता घट होत असल्याचं दिसून येतं आहे पण सुरक्षेचा उपाय म्हणून निर्बंध अजूनही कायम आहेत. मंगळवारी राज्यात 53 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.95 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 68 लाख 68 हजार 816 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के आहे.  सध्या राज्यात 23 लाख 44 हजार 919 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2960 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 72 लाख 82 हजार 128 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha