पुणे : पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) अंतर्गत गटबाजी काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा वसंत मोरे (Vasant More) यांना डावलल्याचा प्रकार समोर आला आहे.  पुणे शहरात मनसेकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. मात्र ही बैठक सुरु होण्याअगोदर नाराजी नाट्य पाहायला मिळालं. यावरून वसंत मोरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर वसंत मोरे यांना मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी थेट शिवतीर्थावरून फोन आल्याची माहिती दिली


पुणे शहरात मनसेकडून दुपारी 12 वाजता पुणे महापालिकेच्या घुले रोड क्षेत्रीय कार्यलय येथील सभागृहात बैठक झाली. साईनाथ बाबर यांनी शहराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पुण्यात मनसेचा पहिलाच मेळावा होतोय. दरम्यान वसंत मोरे या मेळाव्याला अनुपस्थित आहेत. या मेळाव्याच्या 11 जणांच्या कोअर कमिटीतून आपलं नाव वगळल्याचा दावा वसंत मोरेंनी केलाय.  पुणे मनसे कोअर कमिटीमध्ये 11 जण आहेत. यादीत नाव मात्र दहा जण होते. त्यात वसंत मोरे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना रात्री साडे अकरा वाजता या बैठकीबाबत कळवण्यात आलं. या बैठकीला मनसे नेते अनिल शिदोरी, मनसे नेते बाबू वागस्कर यांच्यासह शहराध्यक्ष साईनाथ बाबर व इतर पदाधिकारी  वॉर्ड अध्यक्ष उपस्थितीत होते. ही बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा, शहर संघटनात्मक बांधणी आणि येणाऱ्या महापालिका निवडणुका पार्श्वभूमीवर घेण्यात आली. मात्र मोरे याच नाव नसल्याने मोरे अगोदर बैठकीला उपस्थितीत नव्हते बैठक सुरू झाली आणि त्यानंतर एक तासांनी मोरे बैठकीला पोहचले.


बैठकीला उशीर का झाला असे विचारले असता वसंत मोरे म्हणाले, कोअर कमिटीच्या यादीत नाव नाही. तसेच आता मला शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या घरून  शर्मिला ठाकरे वहिनींचा फोन आला होता. वसंत बैठकीला जाऊन उपस्थितीत राहा. त्यांनतर मोरे यांनी पुण्यातील मनसे पदाधिकारी बैठकीला उपस्थितीत राहिले. मात्र पुणे मनसे मधील अंतर्गत वाद परत एकदा या माध्यमातून पुढे आला आहे. वसंत मोरे यांनी भोंग्याबाबत मांडलेलेल्या भूमिकेला पुणे शहरातील इतर पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर अजूनही शहर मनसेत धुसफूस सुरुच आहे. त्यामुळं आता पुणे शहर मनसेमधील सुरू असलेली नाराजी राज ठाकरे कसे दूर करणार का? हे पाहवे लागणार आहे.