बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 77 दिवस पूर्ण झाली आहेत. हत्येप्रकरणात कृष्णा आंधळेच्या अटकेसह इतर मागण्यांसाठी देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोग गावकरी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.विशेष म्हणजे बारावीची परीक्षा असतानाही वैभवी देशमुख या लढ्यात सहभागी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कालपासून धनंजय देशमुख यांनी पाणीही घेतलेले नाही. तपासाची गती मंदावल्याने कुटुंबीयांसह गावकऱ्यांमध्ये संताप आहे. प्रशासनाने तत्काळ दखल घेतली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वैभवी देशमुख हिचा उद्या बारावीचा शेवटचा पेपर आहे. मात्र, वडिलांच्या हत्येचा न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष थांबवायचा नाही, अशी तिची ठाम भूमिका आहे. (Vaibhavi Deshmukh)
माझी दुसरी परीक्षा सुरु आहे: वैभवी देशमुख
बारावीचा बोर्डाची परीक्षा हा कुठल्याही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा समजला जातो .पण एकीकडे वडिलांचा हत्येचा न्याय मागणारी वैभवी देशमुख न्यायासाठी अण्णा त्याग आंदोलनात सहभागी झाली आहे .एकीकडे वडिलांच्या मृत्यूने आभाळ कोसळलं .दुसरीकडे बारावीच्या परीक्षेने मानसिक तणाव अशी ससेहोलपट होत असताना वैभवी देशमुख खंबीरपणे अन्नत्याग आंदोलनात उतरली आहे .माझ्या आयुष्यात दोन परीक्षा सुरू आहेत एक उद्या संपेल पण दुसरी कठीण आहे .मला वडिलांसाठी न्याय हवाय अशी भावनिक प्रतिक्रिया तिने दिली .बारावीच्या बोर्डाचे वैभवी पाच पेपर झाले .आता शेवटचा पेपर उद्या आहे .तरीही वैभवी देशमुख आज अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाली आहे . माझ्या आयुष्यात दोन प्रकारच्या परीक्षा आहेत .त्यातली एक परीक्षा मी लिहून उद्या देणार आहे .तर दुसरी परीक्षा माझी सुरू आहे माझ्या वडिलांसाठी मला न्याय हवाय असं म्हणत वैभवी देशमुख आंदोलनात सलग दुसऱ्या दिवशी सहभागी झाली . (Santosh Deshmukh Case)
आधार गेला आता उरला केवळ न्याय
माझ्या वडिलांना तर रस्त्यावरून उचलून नेलं .आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार ? प्रशासन नक्की करतंय काय ? असा संतप्त सवाल करत वैभवी वडिलांच्या हत्येचा निषेध करत रस्त्यावर उतरली होती. न्यायासाठी प्रशासनाला जाब विचारत प्रसंगी धीट पावलं उचलत तिने परिस्थिती मोठ्या खंबीरपणे हाताळल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे राज्यभ पडसाद उमटले. ही हत्या एवढी निर्घृण होती की दिवसाढवळ्या खंडणी,अपहरण ,धाकटपट,आणि सरपंच संतोष देशमुख यांची हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला . वडिलांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या वैभवीची 'माझे बाबा परत येणार आहेत का ? ' ही आर्त हाक हृदय पिळवटून टाकणारी होती. वडिलांच्या हत्येनंतर 77 दिवसांचा कालावधी लोटलाय. तरीही या प्रकरणात एक आरोपी फरार आहे. या प्रकरणात कृष्णा आंधळेच्या अटकेसह इतर मागण्यांसाठी आता मस्साजोगच्या ग्रामस्थांसह देशमुख कुटुंबियांनी टोकाचं पाऊल उचललं आहे.
हेही वाचा: