वसईत अनोळखी महिलेचा मृतदेह
एबीपी माझा वेब टीम | 28 Oct 2016 08:03 PM (IST)
वसई : वसईत अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला आहे. जंगलात हा मृतदेह सापडला आहे. हत्या करुन हा मृतदेह टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वसई पूर्व परीसरात नवजीवन शांती नगरच्या रस्त्यालगतच्या जंगलात हा महिलेचा मृतदेह आढळला. महिलेचं वय 25 ते 30 असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या महिलेच्या हातावर पूजा असं नाव गोंदवण्यात आलं आहे. 2 महिन्यापूर्वी याच ठिकाणी एका विवाहित महिलेची हत्या करुन 2 दिवसांच्या जिवंत बाळासोबत फेकण्यात आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.