Sharad Pawar: शरद पवार (Sharad Pawar) यांचा अजित पवारांवर (Ajit Pawar) विश्वास नाही. धमकीमुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे दुसऱ्याला देणार होते, असं वक्तव्य केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा (union minister of state for home ajay kumar mishra) यांनी  केले आहे. ते सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी राज्यातील लोकसभा मतदारसंघात बैठका घेत आहेत. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजप दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता. त्यांच्या या आरोपावार साताऱ्यातील कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी प्रत्युत्तर दिलेय.


आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपनं सुरु केली आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप काही मतदारसंघामध्ये पक्षबांधणी करत आहे. त्या पार्श्वभूमिवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा आज कराड येथे आले होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं.


स्वातंत्र्यवीर सावरकर व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बाबत चुकीची वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत काय बोलायचे राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षातील लोकच गांभीर्याने घेत नाहीत तर अजित पवानावर त्यांचे काका शरद पवार यांचा विश्वास नाही अशी टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केली कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले पश्चिम महाराष्ट्र लोकसभा संयोजक प्रमोद जठार विक्रम पावस्कर धनाजी पाटील एकनाथ बागडी आधी उपस्थित होते मंत्री मिश्रा म्हणाले की राहुल गांधी यांच्या सुरू असलेल्या भारत जोडो यातील आम्ही गांभीर्याने घेत नाही कारण त्यांच्याच पक्षातील लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत तसेच अजित पवार यांनी दबाव तंत्र वापरून विरोधी पक्षनेतेपद मिळवला आहे ते मुख्यमंत्री पदासाठी ही वाटाघाटी करणारे आहेत त्यामुळे त्यांच्या काकांचाच विश्वास त्यांच्यावर राहिलेला नाही. भाजप साताऱ्यासह सर्व महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघात जिंकण्याचे ध्येय ठेवून काम करीत आहे डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा लोकसभा मतदारसंघात विश्वास पूर्ण काम सुरू असून एक मजबूत संघटन झाले आहे गेल्या तीन वर्षात ईडीने केलेल्या कारवाईतून देश देशातील 300 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता जप्त करण्यात आली आहे इडलीचा गैरवापर होत असल्याच्या विरोधकांचे आरोप हा निराशाच्या भावनेतून होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटविल्यानंतर दहशतवादी संख्या कमी झाली आहे या ठिकाणी पर्यटना चालना मिळाली आहे याचबरोबर चीन सीमा भागातील चांगली सुरक्षा यंत्रणा असून एक इंच घेणे एक इंच ही जमीन अतिक्रमण करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले