गँगस्टर अरुण गवळी जेलबाहेर, 28 दिवसांचा फर्लो मंजूर
एबीपी माझा वेब टीम | 13 Apr 2016 01:57 PM (IST)
नागपूर : शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड अरुण गवळी पुन्हा जेलबाहेर आला आहे. गवळीला 28 दिवसांचा फर्लो मंजूर झाला आहे. गेल्या वर्षी मुलाच्या लग्नासाठीही अरुण गवळी जेलबाहेर आला होता. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने गवळीला मुलाच्या लग्नसोहळ्यासाठी 15 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने कुख्यात अरुण गवळीला 2012 साली जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गवळी सध्या नागपूर तुरुंगात शिक्षा भोगत आहे.