नरेंद्र मोदी गंभीरतेने लक्ष ठेऊन आहेत, अतिवृष्टीच्या नुकसानीवर उज्ज्वल निकमांनी सांगितली दिल्लीतील 'मन की बात'
राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Heavy Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत वाहत असल्यामुळं काही भागात पूर आला आहे
Ujjwal Nikam : राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Heavy Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत वाहत असल्यामुळं काही भागात पूर आला आहे. शेतीचं, घराचं मोठं नुकसान झालं आहे. याबाबत खसादार उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील पूरग्रस्तांसाठी मोदी सरकार लवरकरच राज्य सरकारला मदत करेल असा विश्वास उज्वल निकम यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील नुकसानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गंभीरतेने लक्ष ठेऊन
जळगाव विमानतळावर माझी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट झाली होती. यावेळी अतिवृष्टीमुळं जळगाव जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबद्दल आमच्यामध्ये चर्चा झाली आहे. त्यावेळी देवेंद्र फडणीस यांनी राज्यातील नुकसानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गंभीरतेने लक्ष ठेऊन आहेत. राज्य सरकारही नुकसानीचा अहवाल केंद्राला पाठवत आहे. केंद्राच्या मदतीची आपल्याला अपेक्षा आहे. केंद्र सरकार लवकरच राज्याला मदत करेल असा विश्वास खासदार उज्वल निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या भेटीनंतर व्यक्त केला आहे.
राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं थैमान
सध्या राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं (Heavy Rain) थैमान घातलं आहे. विविध भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी भरपाई देण्याची मगणी सरकारकडे करताना दिसत आहे. आम्ही जगावं कसं असा सवाल देखील शेतकरी करत आहेत.
वाशिम जिल्ह्यात नद्यांना पूर
गेल्या दोन दिवसापासून वाशिम जिल्ह्यात बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. मानोरा तालुक्यातील आसोला गावालगत असलेल्या नाल्यावरील पुलावर पुराचे पाणी आल्याने तीन तासापेक्षा अधिक काळ वाहतूक ठप्प होती. सायंकाळच्या दरम्यान शाळेतील विद्यार्थी शेतकरी आणि जनावर घेऊन शेतात अडकलेल्या नागरिकांनी घरी जाण्यासाठी दोर ट्रॅक्टरला बांधून धोकादायक पद्धतीने वाहत्या पाण्यातून प्रवास केला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर
हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आल्याने पुराचे पाणी शेवाळा गावातील नागरिकांच्या घरात शिरलेले आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये आता तीन ते अडीच फूट इतका पाणी असल्यामुळे घरातील सर्व संसार उपयोगी साहित्याचा नुकसान झालेलं आहे संपूर्ण साहित्य पाण्यामध्ये बुडालेलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Ujjwal Nikam Biopic: उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमध्ये 800 कोटींची सुपरहिट फिल्म देणारा अभिनेचा झळकणार; कधी रिलीज होणार?
























