उजनी जल पर्यटनाच्या विरोधात शेतकरी आक्रमक, 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरु, अतिरक्त संपादीत जमिनी परत देण्याची मागणी
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी धरण परिसरात होणाऱ्या प्रस्तावित जल पर्यटन प्रकल्पाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे.
Ujani Dam Tourism Project News : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी धरण (Ujani Dam) परिसरात होणाऱ्या प्रस्तावित जल पर्यटन प्रकल्पाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. प्रशासनाने जी अतिरक्त जमिन संपादीत केली आहे, ती जमिनी शेतकऱ्यांना परत मिळवी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, या जल पर्यटनाच्या विरोधात शेतकऱ्यांना गेल्या 3 दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आलं आहे. उजनी धरण व्यवस्थापन कार्यालय भीमानगर इथं हे आमरण उपोषण सुरु करण्यात आलं आहे.
गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरु
उजनी जलपर्यटनाचा 283 कोटी रुपयांचा आराखडा सप्टेंबर 2024 मध्येच मंजूर झाला. मंजुरीनंतर अद्यापही या कामाला गती मिळालेली नाही. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या जलपर्यटनाला विरोध केला आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या ज्या अतिरीक्त जमिनी संपादीत केल्या होत्या, त्या जमिनीवर हा उजनी जलपर्यटन प्रकल्प होणार आहे. मात्र, या अतिरीक्त संपादीत केलेल्या आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात असी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरु केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत उजनी जलपर्यटन प्रकल्प झाला नाही पाहिजे अशीच भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळं आता प्रशासन सरकार यावर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?
- शासन नियोजीत जल पर्यटनास उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध
- शासन निर्णय 17 जून 2019 आणि 8 ऑक्टोबर 2025 रद्द झालाच पाहिजे
- आपल्या विभागाचे पत्र क्रमांक 3084 हे 3 सप्टेंबर 1992 व पत्र क्रमांक 4035 हे 23 सप्टेंबर 1992 पत्रानुसार हे क्षेत्र मा जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग केले असून, सदर जमिनी गट हे आपल्या विभागास कायमस्वरुपी आवश्यक नसल्याचे नमूद केले आहे. त्याची कार्यवाही व्हावी.
- वर्ग केलेली अतिरीक्त संपादीत जमिनी या मूळ मालकांच्या वारसांना परत देण्यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली आहे.
- उजनी धरणासाठी संपादीत केलेल्या पण आजपर्यंत कधीच पाणी न आलेल्या अतिरीक्त संपादीत जमिनी मुळ मालकांना किंवा त्यांच्या वारसांना परत मिळाव्यात.
- उजनी येथील गट हे न्यायप्रविष्ठ आहेत. हायकोर्टाच पीटीशन दाखल केली आहे. त्यामुळं जमिन मोजमी किंवा अन्य गोष्टीस उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध आहे.
महत्वाच्या बातम्या:
Ujani Dam: उजनी धरण नवीन पर्यटन क्षेत्र म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर येणार; जानेवारीपासून बोटिंग सुरु होणार
महत्त्वाच्या बातम्या





















