Uddhav Thackrey on Amit Shah पुणे : महाराष्ट्राच्या इतिहासात आज जर आपण डोकावून बघितले तर याचं पुण्यावर (Pune) शाहिस्तेखान चाल करून आला होता. मात्र शाहिस्तेखान हा जरा हुशार होता, त्याचं तीन बोटावरच निभावून गेलं. तो तेव्हा गेला तो परत कधी आलाच नाही. तासाचा शहाणपण जर का काही लोकांनी घेतला असता तर ते देखील परत कधी आलेचं नसते. मात्र ते पुन्हा आले आणि ते का आलेत? तर ते गेल्या लोकसभा निवडणुकीत जे फटके महाराष्ट्राच्या जनतेने दिले त्याचे वळ कुठे कुठे पडले आहेत? त्याची चाचपणी करण्यासाठी आले होते. ही परत आलेली व्यक्ती म्हणजे अहमद शाह अब्दाली याचा राजकीय वंशज अमित शाह (Amit Shah) हे होय.
तो देखील शाहाच होता, हे देखील शाहच आहेत. अशा प्रखर शब्दात उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी अमित शाह यांच्या पुण्यातील सभेवर भाष्य करताना टीका केली आहे. आज पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा शिव संकल्प मेळावा संपन्न होत आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी करत राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
औरंगजेब प्रमाणेच भाजपची राजकीय कबर बांधा- उद्धव ठाकरे
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा आज (3 ऑगस्ट) पार पडत आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात असलेल्या गणेश कला क्रिडा या ठिकाणी हा शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पुण्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित आहेत. या मेळाव्यातील पदाधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी चौफेर फटकेबाजी केलीय. आजपासून मी अमित शाहला अहमद शाह अब्दालीच म्हणणार. ते मला नकली संतान म्हणतात, औरंगजेब फॅन क्लब म्हणतात तर मी देखील त्यांना अहमद शाह अब्दालीच म्हणणार. तो अहमद शाह अब्दालीच आहे. त्याला घाबरायचे कारण नाही. ज्या पद्धतीनं औरंगजेबाची इथे कबर बांधली तशीच भाजपची राजकीय कबर बांधा. अशा प्रखर शब्दात टीका करताना उद्धव ठाकरे यांनी टीका केलीय.
तुम्ही आम्हाला काय हिंदुत्व शिकवणार?
नवाब शरीफ यांचा केक खाणारे तुम्ही आम्हाला काय हिंदुत्व शिकवणार? ज्याप्रमाणे शंकराचार्य म्हणाले की, विश्वासघात करणारा कधी हिंदू होऊ शकत नाही, तो विश्वासघात तुम्ही आमचा केला असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला सांगतात की त्यांचे बालपण हे मुस्लिम कुटुंबासोबत गेले आहे. ही जर तुमच्या धर्माची संकल्पना असेल तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी जो काही निर्णय घेतला आणि तो पुढे कोर्टाने हाणून पाडला, त्यावर तुमची भूमिका काय? तुम्ही सांगत आहात ती धर्माची संकल्पना आम्ही मानायची, की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश मध्ये जो विचार पसरवत आहे ती संकल्पना आम्ही मांडायची? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला
इतर महत्वाच्या बातम्या