नागपूर : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2023) आज (11 डिसेंबर) तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackearay) सुद्धा नागपुरात पोहोचले. विधान भवन मुख्य प्रवेशद्वारावर एक वेगळाच योगायोग घडला. महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यापासून भाजपचा एक दिवस चुकला नसेल, किंवा उद्धव ठाकरे यांचा सुद्धा एक क्षण चुकला नसेल जेव्हा टीका केलेली नाही. मात्र, यामध्ये टीकाटिप्पणी करणारे दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची आज (11 डिसेंबर) विधान भवन मुख्य प्रवेशद्वारावर भेट झाली. नेमकी हीच संधी साधतच ठाकरी बाण सोडण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी दवडली नाही. 


जेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले, “काय एकटेच जाता..?” (Uddhav Thackeray on Chandrashekhar Bawankule)


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकाचवेळी प्रवेश करत होते. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी बावनकुळे यांची भेट झाली. त्यावेळी ठाकरेंनी बावनकुळेंना (Uddhav Thackeray on Chandrashekhar Bawankule) मिश्किलपणे कोपरखळी मारली. “ काय एकटेच जाता..?” ठाकरे यांनी मकाऊ प्रकरणावरून बावनकुळेंना कोपरखळी मारल्याने बाजूला असलेल्या लोकांच्या कानावर हा डायलाॅग जाताच एकच हशा पिकला. मकाऊ दौऱ्यात (Chandrashekhar Bawankule Macao visit) बावनकुळे यांचा कथित जुगार खेळताना फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बावनकुळेंवर हल्लाबोल केला होता. 



उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल 


दरम्यान, आज तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी कामकाजात सहभाग घेतल्यानंतर शिंदे फडणवीस सरकावर तोफ डागली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांवर वारंवार एकामागोमाग एक संकटं येत आहेत. विमा कंपन्यांनी आपली दारं खिडक्या बंद केली आहेत, कर्ज वसुलीसाठी बॅंका मागे लागल्या आहेत. काही शेतकरी अवयव विकायला आले होते, अशी टीका त्यांनी केली. 


सत्ताधारी पक्षाकडून गुंडगिरी 


उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्ष गुंडगिरी करत असल्याचा आरोप  केला. ते म्हणाले की, पत्रांचा जमाना आहे निवडणुक आयोगाला पत्र दिलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. या पत्राचं आम्ही स्वागत करतो. जो न्याय नवाब मलिकांना तोच प्रफुल्ल पटेल यांना लागणार का? असा सवाल त्यांनी भाजपला केला. मोदी यांनी स्वतः बीकेसीमधील सभेत कुछ लोक मिरची का व्यवहार करते है, आता त्यांच्यावर कारवाई करणार का? असाही टोला त्यांनी भाजपला यावेळी बोलताना लगावला. 


इतर महत्वाच्या बातम्या